लोकल प्रवासाची परवानगी द्या, अन्यथा ५ हजार रुपये प्रवास भत्ता द्या! भाजपची मागणी 

लस खरेदीसाठी राज्य सरकारने राखून ठेवलेले सात हजार कोटी वाचले आहेत, ते सर्व सामान्यांना प्रवास भत्ता म्हणून वाटावेत आणि उद्रेक टाळावा, असे केशव उपाध्ये म्हणाले.

160

राज्य सरकारने मुंबई व उपनगरातील सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची तत्काळ परवानगी द्यावी, अन्यथा सर्वसामान्य माणसाला प्रवास भत्त्यापोटी दरमहा ५ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते.

कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय!

राज्य सरकारने गेली दीड वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरीय रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार, तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो, त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुंबईतील प्रवासी खासगी वाहतुकदारांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव आहे, अशी शंका सामान्य माणसाला येऊ लागली आहे, असेही उपाध्ये म्हणाले.

(हेही वाचा : निवडक विकासकांच्या फायद्यासाठी ठाकरे सरकारचे निर्णय! अतुल भातखाळकरांचा आरोप )

लस खरेदीतून वाचलेले ७ हजार कोटी जनतेत वाटा 

बई, ठाणे परिसरातील जनतेने आजवर शिवसेनेला भरभरून साथ दिली आहे. या सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला जाणीवच नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच उपनगरी रेल्वे प्रवास बंद असल्याने याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. लस खरेदीसाठी राज्य सरकारने राखून ठेवलेले सात हजार कोटी वाचले आहेत, ते सर्व सामान्यांना प्रवास भत्ता म्हणून वाटावेत आणि उद्रेक टाळावा, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.