PM Modi to Aussie PM : ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या आदरातिथ्यावर पंतप्रधान मोदींनी मानले त्यांचे आभार

PM Modi to Aussie PM : भारतीय संघ सराव सामन्यासाठी सध्या कॅनबेरात आहे 

61
PM Modi to Aussie PM : ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या आदरातिथ्यावर पंतप्रधान मोदींनी मानले त्यांचे आभार 
PM Modi to Aussie PM : ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या आदरातिथ्यावर पंतप्रधान मोदींनी मानले त्यांचे आभार 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ येत्या शनिवारी पंतप्रधानांच्या संघाबरोबर दोन दिवसीय प्रदर्शनीय सामना खेळणार आहे. त्यासाठी संघ सध्या कॅनबेरात आहे. ती संधी साधून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी एल्बिनीज यांनी भारतीय संघाला संसदेत आमंत्रण देऊन त्यांचं आदरातिथ्य केलं. भारतीय खेळाडूंशी त्यांनी संवाद साधला. प्रत्येकाची विचारपूस केली. ही भेट भारत व ऑस्ट्रेलिया देशांमधील वाढता संवाद आणि राजनयीक संबंधांचं प्रतीक मानली जातेय. क्रिकेट हा दोन्ही देशांमधील समान दुवा आहे. आणि त्याचबरोबर उभय देशांमध्ये व्यापारी संबंधही चांगले आहेत. (PM Modi to Aussie PM)

(हेही वाचा- Crime News: मृत्यूनंतर 11 दिवस मुलाला ठेवले व्हेंटिलेटरवर, 6 डॉक्टरांवर गुन्हा दाखल)

भारतीय संघाची भेट घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी ट्विटरवरही आपला आनंद व्यक्त केला. ‘तगड्या भारतीय संघाविरुद्ध माझ्या संघाचा मुकाबला या आठवड्यात होणार आहे. पण, मी आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हटल्याप्रमाणे, माझा पाठिंबा माझ्या ऑस्ट्रेलियन संघालाच असणार आहे.’ (PM Modi to Aussie PM)

एल्बिनीज यांच्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटनेच उत्तर दिलं आहे. भारतीय संघाला आपला पाठिंबाही देऊ केला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने पर्थमध्ये २९५ धावांनी विजय मिळवला यासाठी संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन केलं आहे. ‘माझे मित्र ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी एल्बिनीज यांनी भारतीय संघाचं जे आदरातिथ्य केलं यामुळे मला समाधान वाटलं. भारतीय संघाने मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. १.४ अब्ज भारतीय संघाच्या बाजूने उभे आहेत. भारताने ही मालिकाही जिंकावी यासाठी संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत,’ असं ट्विट मोदींनी केलं आहे. (PM Modi to Aussie PM)

भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही ऑस्ट्रेलियन संसदेसमोर भाषण करताना ऑस्ट्रेलिया आणि भारताला जोडणारा क्रिकेटचा दुवा आणि ऑस्ट्रेलियात क्रिकेट खेळताना वाटणारी मजा यांचं वर्णन संसदेसमोर केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकण्याचा निर्धारही रोहितने व्यक्त केला होता. भारतीय संघाने पर्थमधील विजयानंतर मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. अजून ४ कसोटी बाकी आहेत. (PM Modi to Aussie PM)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.