बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या घरावर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी (ED raids ) या रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांच्या घरावरच नव्हे तर इतरही अनेकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. (Shilpa Shetty)
हेही वाचा- Manipur violence: इम्फाळ व्हॅली, जिरीबाममधील शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू!
पोर्नोग्राफी केससंर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीने ही कारवाई केली आहे. अडल्ट कन्टेंट निर्मिती (Adult content) आणि अशा प्रकारच्या कन्टेंन्टचे मोबाईलच्या अॅपच्या माध्यमातून वितरण केल्याचा राज कुंद्रा यांच्यावर आरोप आहे. याच खटल्यासंदर्भात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. याच आरोपांखाली राज कुंद्रा काही दिवस तुरुंगात होते. आता ते या खटल्यात जामिनावर बाहेर आहेत. (Shilpa Shetty)
ईडीची 15 ठिकाणी छापेमारी
अडल्ट कन्टेन्ट तयार करण्याबाबतच्या आरोपत राज कुंद्रा यांच्या कंपनीचे नाव आले होते. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी ईडीने आज उत्तर प्रदेश आणि मुंबईत एकूण 15 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घराचाही सहभाग आहे. या छापेमारीत ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. (Shilpa Shetty)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community