-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघ गुरुवारी सकाळी पर्थमधून ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा इथं दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी एल्बनीज आणि संसद भेट झाल्यानंतर संघाने संध्याकाळी आपला सरावही सुरू केला आहे. पुढील कसोटी दिवस – रात्र चालणारी असल्यामुळे भारतीय संघाचा सरावही संध्याकाळीच सुरू होणार आहे. गुलाबी चेंडूवर हा सराव चालेल. शनिवारी आणि रविवारी होणारा पंतप्रधानांच्या संघाबरोबरचा सामनाही दिवस – रात्र चालणाराच असेल. (Border – Gavaskar Trophy 2024)
(हेही वाचा- Crime News : भांडुप येथील खाजगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग; लिफ्ट मेकॅनिकला अटक)
भारतीय कर्णधार पर्थ कसोटीत खेळला नव्हता. तो थेट कसोटीच्या चौथ्या दिवशी संघात शामील झाला. तेव्हापासून तो गुलाबी चेंडूने सराव करत आहे. ऑस्ट्रेलियात आल्यापासून त्याने दोन सराव सत्रांमध्ये भाग घेतला आहे. (Border – Gavaskar Trophy 2024)
Perth ✅#TeamIndia have arrived in Canberra! 🛬#AUSvIND pic.twitter.com/IhNtPmIOah
— BCCI (@BCCI) November 28, 2024
भारतीय संघाचा पुढील कार्यक्रम
२९ नोव्हेंबर – मनुका ओव्हल मैदानावर दुपारच्या सत्रात सराव
३० नोव्हेंबर – ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या संघाबरोबर सराव सामना
१ डिसेंबर – ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या संघाबरोबर सराव सामना
२ डिसेंबर – कॅनबेरा ते ॲडलेड प्रवास
दुसऱ्या कसोटीत शुभमन गिल खेळणार की नाही, हे अजून स्पष्ट नाही. सिम्युलेशन सरावादरम्यान त्याच्या डाव्या बोटाचा अंगठा मोडला होता. पर्थ कसोटीदरम्यान तो बोटाला बँडेज गुंडाळून ड्रेसिंग रुममध्ये बसलेला दिसला. पण, प्रवासाच्या व्हीडिओत त्याने हे बँडेज काढून टाकलेलं दिसत आहे. सराव सामना खेळण्याची शक्यता नसली तरी ॲडलेडमधील सरावात त्याच्या सहभागानंतरच दुखापतीचं गांभीर्य समजू शकेल. (Border – Gavaskar Trophy 2024)
(हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या काळात आयटीआयची जागा दिली Urdu Bhavan साठी; भाजपाची आयुक्तांकडे ‘ही’ मागणी)
शुभमनच्या अनुपस्थितीत देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर खेळला. पण, आता रोहित संघात परतल्यावर फलंदाजीचा क्रम पुन्हा एकदा बदलणार आहे. खुद्ग रोहितनही सलामीलाच फलंदाजी करतो का हे ही पाहावं लागेल. कॅनबेरामध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय संघाबरोबर नसतील. ३ डिसेंबरला गंभीर ऑस्ट्रेलियात परततली. तोपर्यंत भारतीय संघाची धुरा प्रशिक्षक म्हणून रायन टेन डयुसकाटे, मॉर्नी मॉर्केल आणि अभिषेक नायर यांच्यावर असेल. (Border – Gavaskar Trophy 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community