Virat Kohli : विराट कोहलीच्या बॅगेतून हे काय काय निघालं?

Virat Kohli : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा इथं आहे.

88
Virat Kohli : विराट कोहलीच्या बॅगेतून हे काय काय निघालं?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कॅनबेरा इथं पोहोचला आहे आणि इथं शनिवारी संघ पंतप्रधानांच्या संघाबरोबर एक प्रदर्शनीय सामना खेळणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संसदेत जाऊन तिथले पंतप्रधान अँथनी एल्बनीज यांची भेट घेतली. एल्बनीज यांनी बुमराहची गोलंदाजीची शैली आणि विराटने (Virat Kohli) पर्थमध्ये झळकावलेलं शतक यांची तारिफही केली. विराटचं शतक ऑस्ट्रेलियन जखमेवर मीठ चोळणारं होतं, असं ते गंमतीने म्हणाले. विराटबरोबर त्यांचा एक छोटा संवादच तिथे रंगला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

त्याचबरोबर विराटचा (Virat Kohli) आणखी एक व्हिडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर, ‘तुमच्या बॅगेत काय आहे?’ हा व्हिडिओ नेहमी दिसतो. या सेलिब्रिटीला हा प्रश्न विचारला जातो आणि ती व्यक्ती बॅग उलगडून त्यातील वस्तू दाखवते. विराटलाही हा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि त्याच्या बॅगेतून काय निघालं ते तुम्ही स्वत:च पाहा,

(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy 2024 : भारतीय संघ कॅनबेरात नेमका कसा सराव करतोय? शुभमन गिलच्या तंदुरुस्तीचा अपडेट काय?)

मोबाईल बघणाऱ्या विराटला (Virat Kohli), ‘तुझ्या बॅगेत काय आहे?’ हा प्रश्न विचारल्या विचारल्या तो बॅगेतून एक एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात करतो. ‘माझ्याकडे कुऱ्हाड आहे, एक बेसबॉल बॅट आहे त्यावर ही वायर लावण्यात आली आहे आणि दोन तलवारीही आहेत,’ असं उत्तर विराट देतो. या सगळ्या वस्तू तो दाखवतोही. त्यामुळे विराटने ऑस्ट्रेलियात येऊन हे काय जमवलं आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

दरम्यान, भारतीय संघाने आता ॲडलेड कसोटीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दिवस-रात्र होणारी ही कसोटी असल्यामुळे संघ निवड आणि खेळातही भारतीय संघाला काही बदल करावे लागणार आहेत. संघाने आपल्या सरावाच्या वेळाही दुपारी आणि संध्याकाळी बदलल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी भारतीय संघ एक प्रदर्शनीय सामना खेळणार आहे. आधीच्या पर्थ कसोटीत विराटने शतक झळकावलं आहे. त्यामुळे या मालिकेत विराट (Virat Kohli) आता पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.