Prithvi Shaw : ट्रोलिंगमुळे कंटाळलेला पृथ्वी म्हणतो, ‘मी कुणाचं काय वाईट केलंय?’

Prithvi Shaw : मुंबई संघातून गच्छंती आणि आयपीएलमध्ये विक्री न झाल्यामुळे पृथ्वी शॉ ट्रोल होत आहे.

50
Prithvi Shaw : ट्रोलिंगमुळे कंटाळलेला पृथ्वी म्हणतो, ‘मी कुणाचं काय वाईट केलंय?’
  • ऋजुता लुकतुके

मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ वर (Prithvi Shaw) आयपीएलच्या मेगा लिलावात बोलीच लागली नाही. त्याची आधारभूत किंमत ७५ लाख रुपये होती आणि तो विक्रीशिवाय राहिला. अलीकडेच मुंबई रणजी संघानेही त्याला तंदुरुस्तीविषयी इशारा देऊन संघातून बाहेर केलं आहे. वजन कमी झालं नाही तर मुंबई संघातही त्याला स्थान मिळणार नाहीए. या सगळ्या प्रकारामुळे पृथ्वी सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. त्याला ट्रोल करणाऱ्या पोस्ट व्हायरलही होत आहेत.

ट्रोलिंगमुळे व्यथित झालेल्या पृथ्वी शॉने पहिल्यांदा त्यावर उघड भाष्य केलं आहे. काही प्रतिक्रिया आणि विधानांमुळे अतीव दु:ख झाल्याचं पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) म्हणाला. ‘अनेक ट्रोलर तर मला सोशल मीडियावर फॉलोही करत नाहीत. तरीही त्यांचं माझ्यावर लक्ष आहे. माझ्यावर केलेली मिम्स माझ्यापर्यंत पोहोचता. त्यातील काही खूपच मानहानीकारक असतात. तेव्हा नक्कीच वाईट वाटतं. मला लोक बाहेर फिरताना पाहतात तेव्हा उगीचच टिपण्णी करतात की, त्याने तर मैदानावर सराव करायला हवा. तो इथे काय करतोय? या सगळ्याचं नक्कीच वाईट वाटतं. मी इतका चुकीचा आहे का?’ असा सवालच पृथ्वी शॉने केला आहे.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या बॅगेतून हे काय काय निघालं?)

अलीकडेच पृथ्वीच्या (Prithvi Shaw) वाढदिवसाच्या पार्टीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर ट्रेंड झाला. त्यावरही पृथ्वीने आता सरावावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, अशा प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यावर बोलताना पृथ्वी म्हणतो, ‘तो माझा २५ वा वाढदिवस होता. मी माझे जवळचे मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर वर्षातून एकदा येणारा वाढदिवस साजरा केला. तर मला इतकं ट्रोल का करावं? ट्रोलिंग करतानाही मागचा पुढचा विचार केला पाहिजे ना?’

सतत लोकांच्या नजरेत असलेल्या सेलिब्रिटींचं खाजगी आयुष्यही खाजगी राहत नाही आणि त्यामुळे जे ट्रोलिंग सहन करावं लागतं याचं हे आणखी एक उदाहरण आहे. यातून पूर्वी सूर्यकुमार यादव आणि आणखीही काही क्रिकेटपटू गेले आहेत. पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) फॉर्म तर सध्या घसरलेला आहेच. पण, त्याचं वजन वाढल्यामुळे मुंबई रणजी संघानेही त्याला तंदुरुस्ती राखण्याचा इशारा दिला आहे आणि जोपर्यंत वजन कमी होत नाही तोपर्यंत त्याला संघात स्थान मिळणार नाहीए. शिवाय तंदुरस्ती आणि आहार याचा एक कार्यक्रम त्याला देण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.