खातेवाटपावरून महायुतीत पेच; Uday Samant यांचा खुलासा

135
राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) पार पडली असून, महायुती मोठ्या संख्येने विजयी झाली आहे. महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आली असली तरी मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) की देवेंद्र फडणवीस, पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याची खलबत सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान, महायुतीने अजूनही मुख्यमंत्री (Maharashtra CM) पदाचा चेहरा जाहीर केला नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. (Uday Samant)
(हेही वाचा – Parliament News: संसदेचे कामकाज 2 डिसेंबर पर्यंत तहकूब ! )
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठांकडे सोपवला म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला असा अर्थ होत नाही. नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) सरकार स्थापनेबाबत जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे म्हणून एकनाथ शिंदे यांनी संवेदनशील आणि बाळासाहेबांचा कडवट सैनिक काय असतो, हे सगळ्यांना दाखवून दिले आहे, असेही उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.
(हेही वाचा – भारताचे प्रवेशद्वार असलेल्या Gate Way Of India ला मिळणार नवी चकाकी)
काय म्हणाले उदय सामंत? 
एकनाथ शिंदे यांचा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होत आहे, असेही सामंत यांना विचारण्यात आले. “मला हल्ली लॉजिकचं कळेना झालंय की, एखादा फोटो बघून एकनाथ शिंदे नाराज आहेत. अजित पवारांचा फोटो बघून नक्की त्यांच्या मनात काय चाललं आहे. हे सगळं माध्यमांकडे कसं पोहोचतं हे फारच मोठं गूढ आहे. मला असं वाटतं की, एकनाथ शिंदे अमित शाहांना भेटले, त्यावेळी सकारात्मक वातावरण होतं. चेहऱ्यावर नाराजी नाही.” तसेच २८ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे महायुतीची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बैठक सकारात्मक झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.