- प्रतिनिधी
महाराष्ट्रात मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचाच (BJP) होणार, मात्र चेहऱ्याबाबत सस्पेन्स कायम आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेक नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत, पण २०१४ नंतर ज्यावेळी भाजपाला (BJP) मुख्यमंत्रीपदासाठी ७२ तासांहून अधिक वेळ लागला आहे, त्यावेळी एक आश्चर्यकारक चेहरा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत दाखल झाला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
कोणकोणत्या राज्यात ७२ तासांहून अधिक काळ लोटला आहे?
२०२४ मध्ये भाजपाला (BJP) ओडिशामध्ये सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. येथे भाजपाला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ८ दिवस लागले. मोहन माळी यांच्या नावाला अखेर पक्षाने मंजुरी दिली. माळी हे आदिवासी समाजातील आहे. ओडिशात मुख्यमंत्रिपदासाठी धर्मेंद्र प्रधान आणि मनमोहन संबल असे प्रमुख दावेदार होते, पण मोहन माळी यांच्या रूपाने आश्चर्याचा चेहरा समोर आला.
२०२३ च्या अखेरीस राजस्थानमध्येही भाजपाला (BJP) सत्ता मिळाली. येथेही मुख्यमंत्रिपदावरून चेहरा स्पष्ट होण्यास ९ दिवस लागले. अखेर भजनलाल शर्मा यांच्या नावावर एकमत झाले. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले शर्मा हे राजस्थान भाजपाचे सरचिटणीस होते. २०२३ मध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा राजे, किरोरी लाल मीणा असे मोठे दावेदार होते.
(हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या काळात आयटीआयची जागा दिली Urdu Bhavan साठी; भाजपाची आयुक्तांकडे ‘ही’ मागणी)
२०२३ मध्ये मध्य प्रदेशातही भाजपाची (BJP) सत्ता परत आली. त्यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान होते. मुख्यमंत्रीपदासाठी चौहानही आघाडीवर होते, पण शेवटी त्यांचे कार्ड कापले गेले. शिवराज यांच्या जागी मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. मोहन यादव त्यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही नव्हते. मध्य प्रदेशात भाजपाला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ८ दिवस लागले.
२०२३ च्या अखेरीस छत्तीसगडमध्ये भाजपाचा विजय झाला. मुख्यमंत्रिपदासाठी पक्षात रमण सिंह आणि अरुण साओसारखे प्रमुख दावेदार होते, पण भाजपने सर्वांना चकित करत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची विष्णुदेव साईंकडे सोपवली. छत्तीसगडमध्ये भाजपाला (BJP) मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७ दिवस लागले.
(हेही वाचा – Parliament News: संसदेचे कामकाज 2 डिसेंबर पर्यंत तहकूब !)
२०१७ मध्ये भाजपाने (BJP) देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवला. सरकारकडे पूर्ण बहुमत असल्याने सर्वांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे लागल्या होत्या. मनोज सिन्हा, केशव प्रसाद मौर्य यांसारख्या मोठ्या नावांचा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत समावेश होता. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपाला ९ दिवस लागले. भाजपाने यूपीमध्ये मुख्यमंत्री चेहरा जाहीर केल्यावर राजकीय जाणकारांना धक्काच बसला. भाजपाने गोरखपूरचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले.
२०१४ मध्ये भाजपा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला. यावेळी भाजपाला सरकार स्थापनेसाठी ७ दिवस लागले आहेत. राजनाथ सिंह निरीक्षक म्हणून दिल्लीहून निघाले तेव्हा विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. फडणवीस त्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. फडणवीसांची एंट्री म्हणजे आश्चर्याचा चेहरा होता. त्यावेळी भाजपामध्ये नितीन गडकरी, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते.
(हेही वाचा – Kabaddi in Australia : बॉक्सिंग डे कसोटी दरम्यान मेलबर्नमध्ये रंगणार कबड्डीचा प्रदर्शनीय सामना)
महाराष्ट्राबरोबरच हरियाणाचेही निकाल आले. हरियाणातही भाजपाची (BJP) सत्ता आली. येथेही भाजपाला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७ दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला. जेव्हा मुख्यमंत्री निवडीचा मुद्दा आला तेव्हा मनोहर लाल खट्टर यांनी अनिल विज आणि रामविलास शर्मा सारख्या नेत्यांना मागे सोडले. खट्टर यांची ही सरप्राईज एंट्री होती.
२०१७ मध्ये भाजपाने (BJP) यूपीसह उत्तराखंडमध्ये विजय मिळवला होता. त्यावेळी भगतसिंग कोश्यारी, बीसी खंडुरी आणि रमेश पोखरियाल निशंक अशी मोठी नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती. उत्तराखंडमध्ये भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी ८ दिवस लागले. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आठ दिवसांनी देवभूमीची धुरा त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याकडे सोपवण्यात आली. या पोस्टवर रावत यांची एंट्री आश्चर्यकारक होती.
(हेही वाचा – भारताचे प्रवेशद्वार असलेल्या Gate Way Of India ला मिळणार नवी चकाकी)
हिमाचलमध्ये २०१७ च्या शेवटी विधानसभा निवडणुका झाल्या. येथेही भाजपाला (BJP) मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७ दिवस लागले. विशेष म्हणजे येथे ज्यांची नावे जाहीर करण्यात आली त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. भाजपाने प्रेम धुमल, जे. पी. नड्डा यांसारख्या नेत्यांना बाजूला सारून जयराम ठाकूर यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले. ठाकूर २०१७ ते २०२२ पर्यंत मुख्यमंत्री होते.
जिथे ७२ तासांपूर्वी निर्णय घेतला जातो, तिथे चेहऱ्याची पुनरावृत्ती होते
२०१९ मध्ये, हरियाणातील भारतीय जनता पक्षाने (BJP) ७२ तासांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे पुन्हा जबाबदारी देण्यात आली होती. तसेच २०२२ च्या गुजरात निवडणुकीत भाजपाला मुख्यमंत्री निवडण्यासाठी केवळ ४८ तास लागले. गुजरातमध्येही पक्षाचे मुख्यमंत्रीपद कायम राहिले. २०२१ मध्ये, त्रिपुराचे निकाल ३ मार्च रोजी आले आणि पक्षाने ७ मार्च रोजी माणिक साहा यांच्या नावाची घोषणा केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community