- विशेष प्रतिनिधी, मुंबई
गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्याचे व चित्रनगरीमधील पेटी बोगद्याचा (कट आणि कवर) यांचे बांधकाम तसेच यांत्रिकी-विद्युत व इतर संलग्नित कामाच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने व्हीजेटीआय मुंबई यांची नेमणूक करण्यात आली आहे. या त्रयस्थ संस्थेमार्फत या प्रकल्पातील बोगदा कामांचे तांत्रिक लेखापरीक्षण अर्थात थर्ड पार्टी टेक्निकल ऑडीट केले जाणार आहे. (Goregaon Mulund Link Road)
(हेही वाचा – Maharashtra Politics : मंत्रिपदासाठी सर्वपक्षीय जोरदार फिल्डिंग; ‘हे’ आहेत मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे)
मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव मुलुंड लिंक रोड अर्थात जीएमएलआर जोडरस्ता प्रकल्प राबविण्यात येत आहे. जीएमएलआर जोडरस्ता या प्रकल्पाने पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व उपनगरातील मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जातील. जीएमएलआर जोडरस्त्याची एकूण लांबी १२.२ कि.मी. असून त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून प्रस्तावित भूमिगत दुहेरी बोगद्याची प्रत्येकी लांबी ४.७ कि.मी. आहे. आणि गोरेगांव फिल्मसिटीमधील प्रस्तावित कट आणि कव्हर पेटी बोगद्याची पोहोच रस्त्यासह लांबी १.६० कि.मी. आहे. (Goregaon Mulund Link Road)
(हेही वाचा – Cemetery : मालाडमधील प्राण्यांची दहनवाहिनी २ डिसेंबर २०२४ पासून तीन आठवडे बंद)
जीएमएलआर प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगदा प्रत्येकी ४.७ किमी व १.६० किमी कट आणि कव्हर पेटी बोगदा कामासाठी जे. कुमार एनसीसी प्रा. लि. या कंपनीची निवड करून त्यांनी २० नोव्हेंबर २०२३ पासून कामाला सुरुवात झाली आहे. टी. बी. एम. मशीनच्या सहाय्याने बोगद्याचे खोदकाम करण्यात येणार आहे. या कामाच्या दर्जाची त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक लेखापरीक्षण करण्याकरिता व्हीजेटीआय मुंबई या संस्थेकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार या कामांसाठी व्हीजेटीआय मुंबईची नियुक्ती केली आहे, अशी माहिती मिळत आहे. जीएमएलआर जोडरस्ता पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरातील सध्याचे रस्त्यांचे जाळे वाहतूक कोंडीपासून मुक्त होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Goregaon Mulund Link Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community