- ऋजुता लुकतुके
सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या अंतिम फेरीत डी गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यातील चौथी लढत अनिर्णित राहिली. दोघांनी यापूर्वी एकेक लढत जिंकली आहे. तर दोन लढती बरोबरीत सुटल्या आहेत. त्यामुळे गुणांत २-२ अशी बरोबरी आहे. लिरेनने या सामन्यात गुकेशला बुचकाळ्यात पाडण्यासाठी रेटी ओपनिंग ही सुरुवातीची रणनीती वापरली. आधीच्या त्याच्या डावांपेक्षा ही रणनीती पूर्णपणे वेगळी होती. पण, गुकेशने हे आव्हान यशस्वीपणे परतवलं. अनपेक्षित सुरुवातीनंतर दोघांचाही खेळ सावध होता. आमि ४२ व्या चालीनंतर दोघांनी बरोबरी मान्य करून टाकली. (World Chess Championship)
डिंगने डावाच्या मध्यावर काळ्या घरातील उंटावर आक्रमण केलं होतं. पण, गुकेशने मधला डाव आणि ते दडपण व्यवस्थित हाताळलं. मग तिथून पुढे सामना अनिर्णित सुटणार हे जवळ जवळ निश्चित झालं. कारण, डावावर कुणा एकाचं वर्चस्व प्रस्थापित होऊ शकलं नाही. शनिवारी पाचवा डाव खेळवला जाईल. तेव्हा गुकेशकडे पांढरे मोहरे असतील. (World Chess Championship)
(हेही वाचा – बांगलादेश सरकारने हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी- S. Jaishankar)
Game 4 ended in a draw after 42 moves at the 2024 FIDE World Championship Match, presented by @Google.
♟ Match score: 2-2#DingGukesh
📷 Maria Emelianova pic.twitter.com/q7KU41GLCF— International Chess Federation (@FIDE_chess) November 29, 2024
‘डावाच्या शेवटी मी थोडंफार वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, काळ्या मोहऱ्यांनी खेळताना तुम्ही प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक चाल मागेच असता. अशावेळी सामना अनिर्णित राखणंच शक्य होतं. मी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय आणि उर्वरित लढतीतही तेच करणार,’ असं गुकेश सामन्यानंतर मीडियाशी बोलताना म्हणाला. (World Chess Championship)
३२ वर्षीय डिंग लिरेनला भारताच्या डी गुकेशने जगज्जेतेपदाच्या लढतीत आव्हान दिलं आहे. १८ वर्षीय गुकेश वयाने सगळ्यात लहान आव्हानवीर तर आहेच आणि त्याने लिरेनला हरवलं तर तो जगातील वयाने सगळ्यात लहान जगज्जेता ठरेल. दोघांमध्ये १४ डाव होणार आहेत आणि पहिल्यांदा ७.५ गुण जिंकणारा खेळाडू जगज्जेता ठरेल. (World Chess Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community