- ऋजुता लुकतुके
पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये प्रस्तावित असलेल्या चॅम्पियन्स करंडकाचा घोळ अजूनही सुरूच आहे आणि स्पर्धेविषयीची अनिश्चितता संपलेली नाही. आयसीसीने अंतिम निर्णय गेण्यासाठी सदस्य देशांची शुक्रवारी बोलावलेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. ही बैठक ऑनलाईन घेण्यात आली होती. बीसीसीआयने पाकिस्तानला संघ पाठवणार नाही ही भूमिका कायम ठेवली आणि भारताचे सामने युएईमध्ये खेळवावेत असा प्रस्ताव ठेवला. तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने संपूर्ण स्पर्धा पाकमध्येच झाली पाहिजे, असा आग्रह सुरूच ठेवला. अखेर वेळ संपल्यावर बैठक थांबवण्यात आली आणि आयसीसीने आणखी काही दिवसांनी सदस्य देशांना पुन्हा एकदा बैठकीसाठी भेटण्याचं आश्वासन दिलं. (Champions Trophy 2024)
(हेही वाचा – बांगलादेश सरकारने हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी- S. Jaishankar)
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धा पाकिस्तानमध्ये प्रस्तावित आहे. पण, स्पर्धेला १०० पेक्षा कमी दिवस उरलेले असताना अजूनही वेळापत्रकही जाहीर झालेलं नाही. कारण, स्पर्धा कुठे भरवणार यावर सदस्य देशांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क असलेल्या स्टार कंपनीलाही पुढे मार्केटिंग कठीण जाणार आहे. स्पर्धेचा प्रचार थंडावलेला आहे. बैठकीत भारत आणि पाकिस्तानची मंडळं आपापल्या भूमिकेवर ठाम राहिली. तर आयसीसीने पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलसाठी तयार होण्याची विनंती केली आणि त्यासाठी नुकसान भरपाई देण्याचीही तयारी दाखवली असं समजतंय. पण, सध्या तरी पाक बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी त्याला बधलेले नाहीत. (Champions Trophy 2024)
(हेही वाचा – २६ जानेवारी Republic Day ला पुण्यात राष्ट्रध्वज कोण फडकवणार?)
आयसीसीची मान्यता मिळालेली नसली तरी पाक बोर्डाने आधीच स्पर्धेचं वेळापत्रक तयार केलं आहे आणि त्यानुसार, तिथल्या सुविधांचं नुतनीकरण सुरू केलं आहे. त्यावर खर्चही केला आहे. त्यामुळे हायब्रीड मॉडेलला त्यांची मान्यता नाही. तर भारत सरकारने संघाला पाकिस्तान दौरा करण्याची परवानगी दिलेली नाही. हीच परिस्थिती अजूनही कायम आहे. आणखी काही दिवसांनी नवीन बैठक होऊन त्यात निर्णय अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात १ डिसेंबरपासून आयसीसीचे अध्यक्ष म्हणून जय शाह पदभार स्वीकारणार आहेत. (Champions Trophy 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community