३०० नव्या लोकल अन् ५ मोठे निर्णय; Devendra Fadnavis यांची ट्विटरद्वारे माहिती

126
३०० नव्या लोकल अन् ५ मोठे निर्णय; Devendra Fadnavis यांची ट्विटरद्वारे माहिती
३०० नव्या लोकल अन् ५ मोठे निर्णय; Devendra Fadnavis यांची ट्विटरद्वारे माहिती

मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. राजधानी मुंबईमधील लोकल सेवेत आणखी 300 नव्या गाड्यांची भर पडणार आहे. त्यासोबतच वसईमध्ये (Vasai Mega Railway Terminals) मोठे मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

हेही वाचा- चर्च आणि मशिद शाळा उघडू शकतात; पण हिंदू मंदिरांना निर्बंध; निवृत्त प्रशासकीय अधिकारी Leena Mehendale यांचा गौप्यस्फोट

केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी तीन महत्वाचे निर्णय घेत मुंबईकरांना मोठे गिफ्ट दिले आहे. या प्रकल्पांमध्ये पोर्ट कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर, मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेलच्या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय, रेल्वेतील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय, जोगेश्वरी (Jogeshwari) येथे नवीन टर्मिनल आणि वसई येथे नवीन मेगा रेल्वे टर्मिनल यासह मुंबई लोकल ट्रेनच्या संख्येत 300 अतिरिक्त गाड्या जोडल्या जातील. (Devendra Fadnavis)

हेही वाचा- Visual Impairment: पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांमध्ये आढळतोय लघुदृष्टीदोष 

या प्रकल्पांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुलभ होईल आणि एमएमआर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि रहदारीलाही चालना मिळणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत. समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने रेल्वेचे तीन मोठे प्रकल्प मंजूर करून जनतेच्या आणि विकासाच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेतल्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनःपूर्वक आभार, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

५ मोठे निर्णय (Devendra Fadnavis)
पोर्ट कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर
मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेलच्या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय.
रेल्वेतील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय
जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनल आणि वसई येथे नवीन मेगा रेल्वे टर्मिनल.
मुंबई लोकल ट्रेनच्या संख्येत 300 अतिरिक्त गाड्या जोडल्या जातील.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.