विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलेले पहायला मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सोशल मीडियासह गल्लोगल्ली सुरु झाली. अशातच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जे ठरवतील, तो अंतिम निर्णय आहे, असे शिंदे म्हणाले.
दरम्यान भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नावाची चर्चा सुरु झाली. फडणवीसांच्या समर्थकांनी महाआरती करत, रक्ताने पत्र लिहत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. त्यात खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी होऊ लागली. त्यामुळे दि. ३० नोव्हेंबर रोजी ट्विट करत मोहोळांनी स्पष्टीकरण दिले आहे.
(हेही वाचा : ३०० नव्या लोकल अन् ५ मोठे निर्णय; Devendra Fadnavis यांची ट्विटरद्वारे माहिती)
खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, असे मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community