अजित पवार यांनी निकाल जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली. त्यामुळे एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पाॅवर कमी झाली. निकालानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सत्तासमिकरणाचे गणित बिघडल्याचे दिसत आहे. (Eknath Shinde)
राज्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काेण, याबाबतचा निर्णय भाजपाचे वरिष्ठ नेते घेतील. आम्ही त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केली. त्यांनी याबाबत कोणत्याही अटी शर्ती माध्यमांसमोर घातलेल्या पहावयास मिळाल्या नाही. त्याचबरोबर अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्यासाठी पूर्णता सकारात्मक भूमिका देखील घेतली. परंतु या उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काही अटी शर्ती घातल्या असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांमध्ये बातम्या चालवल्या गेल्या. निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी त्यांच्या पक्षासोबतच कुटुंबीयांकडून देखील वेगवेगळ्या देवतांना साकडे घातले जात असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या गेल्या. हा देखील एक दबाव तंत्राचाच भाग मानला जातो. (Eknath Shinde)
असे जरी असले तरी भाजप श्रेष्ठींनी महायुतीच्या सर्व नेत्यांना दिल्लीत बोलवून हा दबाव मोडीत काढला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच दिल्लीवारीच्या आधी एकनाथ शिंदे यांनी आपले समर्थन देऊन मोकळे झाले. परंतु त्याच वेळेस मुंबईत परतल्यानंतर शुक्रवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक घेणार असल्याचे दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांनीच सांगितले होते. असे असताना देखील महायुतीची बैठक टाळून शिंदे आपल्या मूळ गावी निघून गेले. हा देखील एक दबाव तंत्राचा भाग आहे. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दिलेले समर्थन शिंदेंसाठी अडचणीचे ठरले आहे. यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर देखील कमी झाल्याचे राजकीय जाणकार मानतात. शिंदेंच्या या दबाव तंत्राला भाजप पक्षश्रेष्ठी किती महत्त्व देतात हा येणारा काळच सांगू शकतो. (Eknath Shinde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community