ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांना Sudhir Mungantiwar यांनी सुनावले खडेबोल

75
ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांना Sudhir Mungantiwar यांनी सुनावले खडेबोल

महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची दाणादाण उडवली. आता त्यांचे नेते ईव्हीएममध्ये गोंधळ केला असल्याचे कारण पुढे करत आहेत. जो तो कॅमेऱ्यासमोर येऊन ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर आगपाखड करत आहे. अशा बोलणाऱ्या विरोधकांना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी खडेबोल सुनावले आहे. विरोधकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी विरोधकांवर केली.

(हेही वाचा – Indian Territory: पाकिस्तानी तरुण चुकून भारतीय हद्दीत घुसला आणि…)

मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, विरोधकांचे जे आमदार निवडून आले आहेत, त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचीही वर्तणूक संशयास्पद आहे. ते काय आमच्यासोबत मॅच फिक्सिंग करून निवडून आलेत का ? ‘ये अंदर की बात है और काँग्रेस के प्रदेशाध्यक्ष हमारे साथ है’, असं काही आहे का, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे निवडून आले, लोकसभेमध्ये त्यांना आमच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, तेव्हा ईव्हीएमवर कुणीच का नाही बोललं नाही, अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विरोधकांवर केली.

(हेही वाचा – आता Uddhav Thackeray निघाले बाबा आढावांच्या मागे)

कायदे करणारे काँग्रसचे ‘ते’ कोण नेते होते ?

1951 आणि 1961 मध्ये दोन्ही कायदे कुणी बदलवले. ते काँग्रेसचे कोण नेते होते, ज्यांनी संसदेत लांबलचक भाषण दिलं होतं की, ‘कागदी मतपत्रिका छापल्यानं गोंधळ निर्माण होतो, बिहार राज्यासारखं बुथ कॅप्चरींग होतं..’ हे कोण बोललं होतं ? 2010 मध्ये मनमोहन सिंह यांनी समिती नेमली होती. त्या समिताचा अहवाल कुणाच्या राज्यात आला ? तो कुणी स्विकारला, असे म्हणत मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विरोधकांवर पुन्हा प्रश्नांची बरसात केली. कर्नाटकमध्ये विजय होतो, तेव्हा काँग्रेस जिंकते आणि हारते तेव्हा ईव्हीएम मशीन हारवते, हा काँग्रेसचा बालिशपणा आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

(हेही वाचा – शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणे, आमचा नैसर्गिक हक्क : Sanjay Shirsat यांचं वक्तव्य चर्चेत)

… तर, कर्नाटकने त्यांना निवडून देऊ नये 

तेलंगणामध्ये ते जिंकले तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे जिंकले. अन् महाराष्ट्रात हारले तर ईव्हीएममुळे हारले, अशी दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. ईव्हीएमवर जर आक्षेप असेल तर निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. कारण त्यांच्यावर हा आरोप नसला पाहिजे की, आम्हाला महायुतीच्या नेत्यांनी निवडून आणलं. छोट्या राज्यामध्ये आम्ही त्यांना निवडून आणतो, हा त्यांचा दुसरा हास्यास्पद आरोप आहे. कारण हा आरोप करून ते कर्नाटकचा अपमान करत आहेत. कारण कर्नाटक हे छोटे राज्य नाही. तर पर कॅपिटा इनकममध्ये पहिल्या पाच राज्यात कर्नाटक पुढे आहे. कर्नाटकबद्दल हे लोक असं बोलत असतील तर कर्नाटकच्या जनतेने त्यांना पुढचे 100 वर्ष निवडून देऊ नये, असे आवाहनही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी कर्नाटकच्या जनतेला केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.