पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती अजूनही कायम आहे. तर पश्चिम बंगालच्या खाडीत तामिळनाडू, पुदुच्चेरीजवळ फेंगल चक्रीवादळाचे सावट आहे. हे चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एकीकडे थंडीने पारा खाली येत आहे, तर दुसरीकडे चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Fengal Cyclone Alert)
राज्यातील बहुतांशी भागात उद्या ढगाळ हवामान तयार होऊ शकते. एवढेच नाही तर ६ डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याआधी राज्यात ३ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव परिसरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मोहोर गळून पडण्याचं टेन्शन आहे. दुसरीकडे उत्तरेकडून गार वारे वाहात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोल्ड वेव्ह अलर्ट देण्यात आला आहे. (Fengal Cyclone Alert)
(हेही वाचा – ‘भाई जगताप यांचे वक्तव्य म्हणजे निवडणूक आयोगाचा अपमान’; काँग्रेस नेत्याला Kirit Somaiya यांचे चोख प्रत्युत्तर )
राज्यात कडाक्याची थंडी पडली असून अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरला. मुंबईत १६.५ अंश सेल्सिअस तापमानात नोंदवलं गेलं असून पुण्यात तापमानाचा पारा ९.५ अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे मुंबईत गारठा वाढला आहे. शुक्रवारी सांताक्रूझमध्ये १६.५ अंश, तर कुलाबा येथे २१.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान आहे. (Fengal Cyclone Alert)
राज्यात निफाडमध्ये पारा ६ अंशापर्यंत घसरला. या परिसरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. दरम्यान राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात थंडीची तीव्रता अधिकाधिक वाढल्यानं पुणेकर चांगलेच कुडकुडलेत. शिवाजीनगरचे किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरलंय. त्यामुळे पुणेकरांनी उबदार कपड्यांना पसंती दिलीय. (Fengal Cyclone Alert)
(हेही वाचा – Sexual Abuse : अभिनेता शरद कपूरने एका रिल्सस्टार तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप; गुन्हा दाखल)
भारतीय हवामान विभागाने (IMD) ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ देशाच्या पूर्वेकडील सागरी सीमेवर हे वादळ धडकणार असून, दूरपर्यंत त्याचे परिणाम दिसून येेणार आहेत. कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश या राज्यांत वादळी वारे, गारा आणि अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. (Fengal Cyclone Alert)
तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो एअरलाइन्सने चेन्नई विमानतळावरील सर्व उड्डाणे आणि लॅडिंग तात्पुरते स्थगित केले आहेत. प्रवासी आणि वैमानिक-केबिन क्रू यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हवामानात सुधारणा झाल्यावर विमानसेवा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. कंपन्यांनी म्हटलंय की, आम्ही प्रवाशांना रीअल-टाइम अपडेटसाठी त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधण्यास सांगितलं आहे. विशेषत: तिरुवन्नमलाई जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पुढील दोन दिवस सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Fengal Cyclone Alert)
(हेही वाचा – ११५ वर्षांपूर्वीच्या कॉलेजवर Waqf Board चा दावा; कॉलेजच्या आवारात ५०० जणांनी केले सामुहिक नमाज पठण)
चेन्नईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक डॉ. एस बालचंद्रन यांच्या दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कराईकल आणि महाबलीपुरममधील भागांसारख्या किनारपट्टीच्या भागांवर अधिक असेल. वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किमी प्रतितासापर्यंत पोहोचू शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या सरकारांने नागरिकांना अत्यावश्यकतेशिवाय घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. (Fengal Cyclone Alert)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community