रिंगरोडसाठी पूर्व भागातील २९ तसेच पश्चिम भागातील सात अशा ३६ गावांमधील काही जागांचे मोबदल्याचे निवाडे अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे हे निवाडे व शिल्लक राहिलेले भूसंपादन येत्या दि. ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Ring Road Pune)
रिंगरोडसाठीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. यावेळी संबंधित उपविभागीय अधिकारी व भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. रिंगरोडच्या पूर्व भागाचे ८० टक्के तर पश्चिम भागात ९८ टक्के जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्यात काही गावांतील काही क्षेत्रांचे निवाडे तसेच भूसंपादन अद्याप झालेले नाही. (Ring Road Pune)
(हेही वाचा – ‘भाई जगताप यांचे वक्तव्य म्हणजे निवडणूक आयोगाचा अपमान’; काँग्रेस नेत्याला Kirit Somaiya यांचे चोख प्रत्युत्तर )
त्यात पूर्व भागातील मावळ तालुक्यातील ६, पुरंदर आणि खेडमधील प्रत्येकी ५ तसेच हवेली तालुक्यातील १३ गावांमधील निवडक जमिनींचे मोबदल्याचे निवाडे व भूसंपादन रखडले आहे. तसेच पश्चिम भागातील मुळशी, हवेली तालुक्यातील प्रत्येकी 3 आणि भोर तालुक्यातील एका गावातील काही क्षेत्राचे भूसंपादन अद्याप झालेले नाही. (Ring Road Pune)
रिंगरोड जात असलेल्या मावळ, पुरंदर, हवेली, खेड, भोर या पाचही तालुक्यांतील काही जमिनींचे संपादन रखडले आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या संमती घेणे, संमती न दिल्यास सक्तीने भूसंपादनाचा प्रस्ताव देणे, संमतीनंतर निवाडा जाहीर करणे आणि थेट भूसंपादन करणे हे झालेले नाही. त्यामुळे या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्व आणि पश्चिमेकडील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. (Ring Road Pune)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community