Baba Adhav यांचा बोलविता धनी कोण?

जेव्हा जेव्हा राज्यात एखादा सामाजिक विषय पेटवला जातो, तेव्हा त्याचा एक चेहरा तयार केला जातो, जसा मराठा आंदोलनासाठी जरांगे पाटील हा चेहरा तयार केला होता, या निवडणुकीत त्यांचाही निकाल लागला आहे. आता ईव्हीएम विरोधात बाबा आढाव (Baba Adhav) यांना समोर करण्यात आले आहे.

323
  • नित्यानंद भिसे 

१९६३ मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (Baba Adhav) यांनी पुण्यात पहिली नगरसेवक पदाची निवडणूक लढवली आणि जिंकली, त्यानंतर १९६८ मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. १९६७ आणि १९७१ मध्ये त्यांनी खासदारकी लढवली, पण काँग्रेसनेच त्यांचा पराभव केला होता. बाबा आढाव यांचा इतकाच निवडणूक राजकारणाचा अनुभव आहे. त्यावेळी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या होत्या, आता बाबा आढाव ईव्हीएमवर बोलत आहेत. २००४ सालापासून ईव्हीएम सुरू आहे, २००४, २००९ मध्ये लोकसभा असो किंवा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक असो काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जिंकली, तेव्हा आढाव (Baba Adhav) यांना ईव्हीएमवर अविश्वास वाटला नाही, आता २०१४, २०१९ मध्ये भाजपाप्रणित रालोआ सरकार आले तेव्हा विरोधकांनी ईव्हीएमविरोधात बोलणे सुरु केले, आता २०२४मध्येही रालोआचे सरकार आल्यामुळे विरोधकांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि बाबा आढाव यांनाही ईव्हीएम चुकीचे वाटू लागले आहे. हा विरोधाभास नाही का? त्यामुळे मागील ३-४ दशके अज्ञातवासात गेलेले आढाव अचानक वयाच्या ९५व्या वर्षी रस्त्यावर उतरून उपोषण करतात, ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करतात, यामागे त्यांचा बोलविता धनी दुसरा कुणीतरी आहे, हे निश्चित.

बाबा आढाव दुसरे जरांगे पाटील? 

आज जे निवडणूक हरले आहेत, त्यांना त्यांचा विरोध प्रकट करण्यासाठी कोणता तरी चेहरा हवा होता, म्हणून त्यांनी ९५ वर्षीय बाबा आढाव (Baba Adhav) यांना उभे केले आहे. मुळात ईव्हीएमवर आक्षेप एकाच कारणाने घेतला जात आहे. काही ठिकाणी जिंकलेले आणि हरलेले उमेदवार या दोघांना समसमान मते कशी मिळाली, पण तशी मते झारखंडमध्येही मिळाली आहेत, मग तिथे ईव्हीएम चुकीचे नाही का? ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी कुठे तरी गांधीवादी चेहरा हवा होता म्हणून बाबा आढाव यांना समोर केले, तरी मुळात त्यामागे कुणाचा हात हे सर्वजण जाणतात. जेव्हा जेव्हा राज्यात एखादा सामाजिक विषय पेटवला जातो, तेव्हा त्याचा एक चेहरा तयार केला जातो, जसा मराठा आंदोलनासाठी जरांगे पाटील हा चेहरा तयार केला होता, या निवडणुकीत त्यांचाही निकाल लागला आहे. आता ईव्हीएम विरोधात बाबा आढाव (Baba Adhav) यांना समोर करण्यात आले आहे. यामागे शरद पवार आहे हे सगळेच जण जाणून आहेत.

(हेही वाचा Baba Adhav यांचे आत्मक्लेश आंदोलन की प्रति अण्णा हजारे होण्याची खटपट?)

आढाव गांधीवादी आहेत का? 

मुळात बाबा आढाव गांधीवादी चेहरा नाही, त्यांनी सोशलिस्ट पार्टीमध्ये राहून दहा एक वर्षे राजकारण केले आणि नंतर असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आंदोलने केली. त्यावेळी कामगार संघटनांवर डाव्यांचाच प्रभाव होता. बाबा आढाव (Baba Adhav) त्याच विचारांचे वाहक आहेत, ते गांधीवादी नाही. असते तर काँग्रेसने त्यांचा दोन वेळा खासदारकीच्या निवडणुकीत पराभव केला नसता.

ईव्हीएमविषयी न्यायालयाने विरोधकांना सुनावले 

मुळात ईव्हीएम हॅक होते, हा विषय आताच सुरू झाला, असे नाही. जेव्हा जेव्हा काँगेस आणि त्यांचे समविचारी पक्ष निवडणूक हरतात, तेव्हा ते अशी ओरड करत असतात. अताची निवडणूक झाल्यानंतरही विरोधक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदवली, ती विरोधकांसाठी चपराक होती. न्यायालय म्हणाले, तुम्ही जेव्हा निवडणुका हरता, तेव्हा तुम्हाला ईव्हीएम चुकीचे वाटते आणि तुम्ही आमच्याकडे येता, पण तुम्ही जेव्हा निवडणूक जिंकता तेव्हा तुम्हाला ईव्हीएम बरोबर कसे वाटते? स्वतः काँग्रेसचे उच्च विभूषित नेते, परदेशात इंजिनियरिंग करून आलेले पृथ्वीराज चव्हाण यांनीही ईव्हीएम हॅक करता येवू शकत नाही असे म्हटले आहे, त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे, मात्र त्यांनी पुन्हा ईव्हीएम चाचणीची मागणी केली नाही, जी २२ उमेदवारांनी केली आहे हे ठळकपणे अधोरेखित झाले पाहिजे. (Baba Adhav)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.