VIP Number Plate : पसंतीच्या क्रमांकासाठी नको चक्कर; ॲपवर मिळवा व्हीआयपी नंबर !

100
VIP Number Plate : पसंतीच्या क्रमांकासाठी नको चक्कर; ॲपवर मिळवा व्हीआयपी नंबर !

तुम्हाला तुमच्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक हवा असेल, तर आरटीओ कार्यालयात जाण्याची, अर्ज करण्याची कटकट आता संपली आहे. परिवहन विभागाने पसंतीच्या क्रमांकासाठी सॉफ्टवेअर विकसित केले असून, ही सेवा राज्यभरातील आरटीओ कार्यालयांशी संलग्न करण्यात आली आहे. (VIP Number Plate)

अमरावती आरटीओ कार्यालयात २८ नोव्हेंबरपासून ही सुविधा सुरू झाली आहे. नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाइन अर्ज व शुल्क भरून पसंतीचा क्रमांक मिळविता येणार आहे. आपल्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक मिळावा, यासाठी अनेकजण वाटेल ती किंमत मोजतात. अशावेळी पसंतीचा क्रमांक मिळवून देण्याच्या बहाण्याने दलालांची साखळी वाहन मालकांची लूटही करते, परंतु परिवहन विभागाने स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. (VIP Number Plate)

(हेही वाचा – बांगलादेशात चिन्मय कृष्ण दाससह ISKCON च्या १७ जणांची बँक खाती गोठवली, युनूस सरकारचा निर्णय)

व्हीआयपी नंबरसाठी मोजले १५ लाख

वाहनावर आपल्या आवडीनुसार नंबर घेतला जातो. लाखो रुपयांची कारची खरेदी केल्यानंतर आवडीच्या नंबरसाठी मोठी रक्कम मोजतात. यंदा आतापर्यंत व्हीआयपी नंबरसाठी १५ लाखांवर रक्कम मोजली गेली आहे. (VIP Number Plate)

सॉफ्टवेअर बनणार; नंबर ऑनलाइन मिळणार

लकी नंबर मिळविण्यासाठी वाहनधारक अधिक पैसे मोजायला तयार असतात. सध्या आरटीओ कार्यालयात जाण्याऐवजी ऑनलाइन नंबर मिळवता येणार आहे. आता दलालापासून सुटका मिळणार आहे. आकर्षक क्रमांकासाठी वाहन चालकांना पैसे मोजावे लागणार नाही. (VIP Number Plate)

(हेही वाचा – Sanjivan Samadhi Sohala : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा समारोप)

दलालांचा पत्ता कट

पसंतीचा नंबर मिळवून देण्याच्या अनुषंगाने अनेक दलाल सक्रिय असतात; मात्र आता ऑनलाइन पद्धतीने काम होणार असल्याने दलालांचा पत्ता कट झाला आहे. (VIP Number Plate)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.