डिसेंबरपर्यंत ५,२०० पोलिसांची होणार भरती!

औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक झाली. कायदा सुव्यवस्था परिस्थिती आणि गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली.

174

महाराष्ट्र पोलिस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ५,२०० पदे कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबर पूर्वी भरण्यात येतील. नंतर 7 हजार पदे भरली जातील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक झाली. कायदा सुव्यवस्था परिस्थिती आणि गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना चांगली घरे, चांगली सुविधा मिळाव्यात याबाबत चर्चा झाली. सर्वसामान्य माणसाला सौजण्याची वागणूक मिळाली पाहिजे. महिला आणि त्याबाबत घडणारे गुन्हे याबाबत आस्थेवाईकपणे निर्णय घेतले पाहिजे. दोषींना शिक्षा केली पाहिजे या सूचना वळसे पाटील यांनी दिल्या.

(हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासे विक्रेत्यांचे कुठे होणार पुनर्वसन?)

आर्थिक आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण जास्त

आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे यांचे प्रमाण मोठे आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर शाखेने चांगले काम केले पाहिजे. सोशल मीडियातून महिलांची बदनामी केली जाते याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नाही ते वाटप करण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. संख्या वाढत आहे, रक्कम वाढत आहे, कोविडची अडचण आहे, पण कर्जासाठी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे वळसे पाटील म्हणाले.

मृत कर्मचाऱ्याच्या पाल्याला नोकरी

कोविडमध्ये ज्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचे धोरण स्पष्ट आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे,.50 लाख देण्याचे काम पूर्ण झाले आहे, जे राहील आहे त्यांना पण तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.