New Rule : डिसेंबरच्या १ तारखेपासून ‘या’ गोष्टीत होणार बदल

337
वर्षाचा शेवटचा महिना, सुरू झाला आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे डिसेंबरच्या महिन्यातही अनेक छोटे-मोठे बदल झाले आहेत. त्याचा सर्वसामन्यांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या १ तारखेपासून बदल (December 1 New Rules) लागू होतील. दरम्यान, डिसेंबरला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती आणि क्रेडिट कार्डच्या (credit card) नियमांसह अनेक बदल होणार. (New Rule)
गॅसच्या किमतीत वाढ
साधारणतः महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार एलपीजी गॅसच्या किंमतीत सुधारणा करते. गेल्या काही महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती बदलल्या आहेत तर घरगुती गॅस एलपीजीच्या किंमती मार्च महिन्यापासूनच स्थिर आहेत. अशा परिस्थितीत यावेळीही एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल अपेक्षित असून ऑक्टोबर महिन्यात गॅस कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (LPG cylinder) किंमत ४८ रुपयांनी वाढली होती. (New Rule)

(हेही वाचा – 25 किलो सोने, 4 कोटींची रोकड आणि 8 लॉकर्स… ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्यावर Income Tax Department चा छापा)

SBI क्रेडिट कार्ड

कार्डसंबंधीत एक नवा नियम १ डिसेंबर पासून बदलणार आहे. जर तुमच्या घर खर्चात डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/ मर्चेंटसंबंधीत काही ट्रांजॅक्शन असतील तर त्यासाठी तुम्ही SBI क्रेडिट कार्डचा वापर करु शकतात. कारण १ डिसेंबर नंतर तुम्हाला त्यावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत. त्यांच्या वेबसाईटला ही माहिती देण्यात आली आहे. 

OTP साठी प्रतीक्षा 
व्यावसायिक संदेश आणि ओटीपीशी संबंधित ट्रायला ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्याचा घेतलेला निर्णयाची यापूर्वी ३१ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी होती होती पण, अनेक कंपन्यांच्या मागणीनंतर अंतिम मुदत ३१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे आता ट्रायचा हा नियम १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. दूरसंचार कंपन्यांनी पाठवलेले सर्व संदेश ट्रेस करण्यायोग्य असतील जेणेकरून फिशिंग आणि स्पॅमची प्रकरणे थांबवण्याचा यामागचा उद्देश आहे. नवीन नियमामुळे ग्राहकांना ओटीपी डिलिव्हरीला विलंब होऊ शकतो.

मालदीव पर्यटक शुल्क

मालदीव पुढील महिन्यापासून प्रस्थान शुल्कात वाढ करत आहे. सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या मालदीवने पर्यटकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे. इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी ३० डॉलर (२,५३२ रुपये) वरून ५० डॉलर, तर बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठी हे शुल्क ६० डॉलरवरून १०,१२९ डॉलरपर्यंत वाढणार आहे. प्रथम श्रेणीतील प्रवाशांना ९० डॉलरऐवजी २४० डॉलर (२०,२५७ रुपये) आणि खासगी जेट प्रवाशांना १२० ते ४८० डॉलर मोजावे लागतील.

(हेही वाचा – Baba Adhav यांचा बोलविता धनी कोण?)

आधारकार्ड

युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) आधार डिटेल्समध्ये मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली. आधार कार्डधारकांना (Aadhar Card) आता १४ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे आपले नाव, पत्ता किंवा जन्मतारीख कोणत्याही शुल्काशिवाय अद्ययावत करता येणार आहे. मात्र, या तारखेनंतर केलेल्या अपडेटवर प्रोसेसिंग फी लागणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.