Cyclone Fengal चा तडाखा बसायला सुरुवात, चेन्नई विमानतळ 15 तास बंद!

80
Cyclone Fengal चा तडाखा बसायला सुरुवात, चेन्नई विमानतळ 15 तास बंद!
Cyclone Fengal चा तडाखा बसायला सुरुवात, चेन्नई विमानतळ 15 तास बंद!

फेंगल चक्रीवादळामुळे (Cyclone Fengal) हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर आणि 01 डिसेंबर रोजी किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे आता मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. फेंगल चक्रीवादळ (Cyclone Fengal) शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता पुद्दुचेरीच्या (Puducherry) पूर्वेकडील समुद्रकिनारी धडकले. यादरम्यान हवेचा वेग ९० किमी प्रतितास होता. वादळ धडकण्याची ही प्रक्रिया सुमारे ४ तास चालली. त्यामुळे तामिळनाडूतील चेन्नईसह ७ जिल्ह्यांत, पुद्दुचेरी, कर्नाटक (Karnataka) व आंध्रातील सागरी किनारी भागात जोरदार पाऊस झाला. ८० किमी प्रतितास वेगाने हवेचा वेग होता. (Cyclone Fengal)

चेन्नईच्या (Chennai) समुद्रकिनारी एक मीटर उंचीच्या लाटा धडकत होत्या. चक्रीवादळाच्या तडाख्यातून विमानांचे संरक्षण करण्यासाठी चेन्नईचे विमानतळ दुपारी १२.३० ते सायंकाळी ७ पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. पण रात्रीही जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत उड्डाणे बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला होता. (Cyclone Fengal)

३ दिवस पावसाचा जोर
त्यामुळे चेन्नईतून ५५ विमाने रद्द करावी लागली. तर बाहेरहून येणारी १२ विमाने बंगळुरूच्या विमानतळावर वळवण्यात आली. वादळ येण्याच्या ६ तास आधीच जोरदार पाऊस सुरू झाल्याने चेन्नईच्या खालचा भाग जलमय झाला होता. वादळ किनाऱ्यावर धडकल्यानंतर त्याची तीव्रता थोडी कमी झाली. परंतु पुद्दुचेरी व तामिळनाडूतील कांचीपुरम, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कुड्‌डालोर, विल्लुपूरम, कल्लाकुरिची, चेन्नई व मरियादुथुराई जिल्ह्यात पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता. चेन्नई विज्ञान केंद्राच्या मते, अजून ३ दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. (Cyclone Fengal)

४ राज्यांमध्ये हिमवर्षाव शक्य
पाकिस्तानातून येणारे पश्चिमी विक्षोभ जम्मू-काश्मीरच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पुढच्या एक-दोन दिवसांत काश्मीर, लड्डाख, हिमाचल, व उत्तराखंड या भागात हिमवर्षावाची शक्यता आहे. समुद्रसपाटीपासून ३ हजार मीटर असलेल्या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान व पश्चिमी उत्तर प्रदेशातही ढगाळ वातावरण असेल, पण पावसाची शक्यता कमीच आहे. (Cyclone Fengal)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.