Durgadi गडाची डागडुजी थांबणार नाही; प्रशासनाने वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला

154
Durgadi गडाची डागडुजी थांबणार नाही; प्रशासनाने वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला
Durgadi गडाची डागडुजी थांबणार नाही; प्रशासनाने वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला

कल्याण (Kalyan) येथील ऐतिहासिक दुर्गाडी (Durgadi Fort) गडाची डागडुजी आणि नूतनीकरण यांचे काम मागील ६ महिन्यांपासून चालू होते; मात्र गडाच्या दुरुस्तीला वक्फ बोर्डाची (Waqf Board) हरकत असल्याचे सांगत दुरुस्तीचे काम थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पत्राची चौकशी करून कळवण्याविषयी महापालिकेला सांगितले होते; मात्र महापालिका प्रशासनाने पत्राचा संदर्भ जोडता येत नसल्याचे नमूद करत ही हरकत फेटाळली आहे, तसेच गडाच्या डागडुजीचे काम न थांबवता ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

(हेही वाचा – Canada करत आहे भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकार्‍यांची हेरगिरी)

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत रखडले होते काम

कल्याण शहरातील दुर्गाडी गडाची दुरवस्था झाल्याने त्याच्या डागडुजीचे काम करायचे होते. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत (loksabha election 2024) हे काम रखडले होते. नागरिकांनी याविषयी खेद व्यक्त केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करत गडाच्या दुरुस्तीचे काम चालू करण्याचे आदेश देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. जून २०२४ मध्ये गडाच्या दुरुस्तीला प्रारंभ करण्यात आला. नेवासा दगडाद्वारे गडाची दुरुस्ती केली जात आहे. त्याला वक्फ बोर्डाची हरकत असल्याचे सांगत दुरुस्तीचे काम थांबवण्याची मागणी केली होती.

‘‘वक्फ बोर्डाचा हवाला देत एका नागरिकाने गडाच्या कामाला हरकत घेणारे पत्र दिले होते. न्यायालयाचा अपमान होऊ नये; म्हणून या पत्राची शहानिशा करण्यासाठी महापालिका प्रशासनाला कळवण्यात आले होते; मात्र प्रशासनाने तपासणीअंती काम बंद न करता ते चालू ठेवण्याविषयी कळवले आहे,’’ असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता संपदा मोहरीर यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.