Kash Patel: डीप स्टेट चे विरोधक अशी प्रतिमा असणारे काश पटेल अमेरिकन एफबीआय चे प्रमुख… डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा मास्टर स्ट्रोक

192
Kash Patel: डीप स्टेट चे विरोधक अशी प्रतिमा असणारे काश पटेल अमेरिकन एफबीआय चे प्रमुख... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा मास्टर स्ट्रोक
Kash Patel: डीप स्टेट चे विरोधक अशी प्रतिमा असणारे काश पटेल अमेरिकन एफबीआय चे प्रमुख... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा मास्टर स्ट्रोक

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शनिवारी (30 नोव्हें.) काश पटेल (Kash Patel) यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) (एफबीआय)चे नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान काश पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ राहिले आहेत. तुलसी गब्बार्ड यांच्याकडे नॅशनल इंटेलिजन्सची जबाबदारी दिल्यानंतर आता पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी प्रशासनात संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत. (Kash Patel)

हेही वाचा- ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दिवाळी अंक आला; Raj Thackeray यांच्या हस्ते प्रकाशन

काश पटेल हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय
ट्रम्प यांनी काश पटेल (Kash Patel) यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. गुजराती असलेले काश पटेल हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मला हे जाहीर करताना अभिमान वाटत आहे की, कश्यप ‘काश’ पटेल केंद्रीय तपास यंत्रणेचे नवीन संचालक म्हणून काम करतील. काश (Kash Patel) एक चांगले वकील आहेत. तपास करणारे आणि अमेरिका फर्स्ट फायटर आहेत, ज्यांनी त्यांची कारकीर्द भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी, न्यायाची रक्षा करण्यासाठी आणि अमेरिकेच्या लोकांचे रक्षण करण्यात घालवली आहे.”

काश पटेल यांचे नाव CIA चे प्रमुख म्हणून चर्चेत
वॉशिंग्टनच्या राजकीय वर्तुळात काश पटेल यांचे नाव सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरो (CIA) चे प्रमुख म्हणून चर्चेत होते, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी या पदावर त्यांचे जवळचे सहकारी जॉन रॅटक्लिफ (John Ratcliffe) यांची नियुक्ती केली. पटेल यांच्या नावाची घोषणा करत असतानाच ट्रम्प यांनी फ्लोरिडाच्या हिल्सबरो (Hillsborough) काउंटीचे शेरीफ चॅड क्रोनिस्टर यांची ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीचे प्रमुख म्हणून नेमणूक केल्याची घोषणा देखील केली. (Kash Patel)

कोण आहेत काश पटेल ?
44 वर्षीय काश पटेल (Kash Patel) यांचे पूर्ण नाव कश्यप प्रमोद पटेल असे आहे. त्यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. त्यांचं कुटुंब मूळचे गुजरातमधील वडोदरा येथील आहे. त्यांचे कुटुंब पेशाने वकील आहे. काश पटेल यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय व्यक्तींपैकी एक समजले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काश पटेल हे राष्ट्राध्यक्षांचे उप सहायक आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचे वरिष्ठ संचालक म्हणून कार्यरत होते. काश पटेल (Kash Patel) हे ख्रिस्तोफर रे यांची जागा घेतील. ख्रिस्तोफर रे यांना २०१७ मध्ये नियुक्त करण्यात आले होते. पण, नंतर त्यांची राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी पटलं नाही. एफबीआयच्या संचालकपदाचा कार्यकाळ १० वर्षांचा असतो. गेल्या अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यावर आणि एफबीआयवर जाहीरपणे टीका करत आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.