मुंबईमध्ये रविवारी जिथे ५५५ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी ४७८ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतील दिवसभरातील कोविड रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आली असून दिवसभरात ७०१ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्णांची पाचशेच्या आत आलेली रुग्णसंख्या पुढे अशाचप्रकारे कायम राहत अथवा खाली आल्यास मुंबईकरांचा लोकलप्रवास खुला होण्यास मदत होवू शकते.
#CoronavirusUpdates
१२ जुलै, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ४७८
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ७०१
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०३०७७
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%एकूण सक्रिय रुग्ण- ७१२०
दुप्पटीचा दर- ९२६ दिवस
कोविड वाढीचा दर ( ५ जुलै ते ११ जुलै)- ०.०७ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 12, 2021
दिवसभरात १५ जणांचा मृत्यू
मुंबईमध्ये सोमवारपर्यंत ७,१२० रुग्णांवर विविध कोविड सेंटर तथा रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. तर दिवसभरात ४७८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. रविवारी दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे सोमवारी ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(हेही वाचा : कोविड रुग्णांवर अँटीबॉडीज कॉकटेलचा प्रयोग यशस्वी! काय आहे हा नवा प्रयोग?)
मुंबईत रुग्ण दुपटीचा दर ९२६ दिवसांवर आला!
सोमवारी मृत्यू झालेल्या ०९ रुग्णांपैकी ०७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ०७ रुग्ण हे पुरुष तर २ रुग्ण या महिला होत्या. तर मृत्यू पावलेल्यांमध्ये १ रुग्ण हे चाळीशीच्या आतील आहेत. तर ५ रुग्ण हे साठी पार केलेले आहेत. उर्वरीत २ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहेत. मुंबईतील रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ९६ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ९२६ दिवसांएवढा आहे. झोपडपट्टी व चाळींमधील सक्रीय कंटेन्मेंटची संख्या अवघ्या पाचवर आली आहे. तर इमारतींची संख्या ही ६७ वर आली आहे
Join Our WhatsApp Community