महाराष्ट्रातील EVM विरोधी आंदोलन असल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ निघाला दिल्लीचा

जानेवारी 2024 मध्ये दिल्लीतील जंतरमंतरवर विविध संघटना ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करत होत्या. तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे.

141

‘ईव्हीएम हटवा आणि देश वाचवा’ अशा घोषणा देत जमावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओला महाराष्ट्राच्या निवडणुकीशी जोडत आहेत आणि दावा करत आहेत की EVM च्या विरोधात लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. या व्हिडिओची BOOM ने सत्यता पडताळली, तेव्हा हा व्हायरल व्हिडिओ जानेवारी 2024 मध्ये झालेल्या निघाला. जानेवारी 2024 मध्ये दिल्लीतील जंतरमंतरवर विविध संघटना ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करत होत्या. तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने 235 जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडी केवळ 49 जागांवर मर्यादित राहिली. निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर काँग्रेसने अनियमिततेचा आरोप करत तक्रार केली होती. याशिवाय 95 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी पुण्यात निवडणूक प्रक्रियेत ‘फसवणूक’ झाल्याचा दावा करत ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

(हेही वाचा EVM हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल)

यानंतर एका नेटकऱ्याने व्हिडिओ शेअर करत म्हटले की, संपूर्ण विरोधक लवकरच एकजूट होऊन रस्त्यावरून सभागृहापर्यंत आवाज उठवण्याची तयारी करतील,  ‘भाऊ, महाराष्ट्रात ईव्हीएम हटवण्यासाठी लोकांचा प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे, आता भाजपचा पराभव झाला आहे. हे निश्चितपणे पाहिले जाऊ शकते का, लवकरच संपूर्ण विरोधक एकत्र येऊन रस्त्यावरून सभागृहात आवाज उठवण्याची तयारी करतील, असे म्हटले.

फॅक्ट चेक 

हा व्हिडिओ दिल्लीच्या जंतर मंतर येथे ईव्हीएम (EVM) बंदीच्या निषेधाचा आहे, दाव्याची पडताळणी करण्यासाठी BOOM ने Google Lens सह व्हायरल व्हिडिओ शोधला. तेव्हा जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये सोशल मीडियावर काही नेटकर्त्यांच्या पोस्ट आढळल्या. या पोस्ट्समध्ये ईव्हीएम बंदीबाबत दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलन असे वर्णन करण्यात आले आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना स्टॅलिन नावाच्या एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘ईव्हीएम (EVM) बंदीच्या विरोधात एवढं मोठं आंदोलन सुरू आहे की कुठलाही गोदी मीडिया दाखवायला तयार नाही.’ या आंदोलनाचे वृत्त संकलन करणारे पत्रकार उपेंद्र कनोजिया यांनी बूमला सांगितले की, “दिल्लीच्या जंतरमंतर येथील आरजेडी कार्यालयाजवळील ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा हा जुना व्हिडिओ आहे.”

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.