महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी पहिल्यांदाच महिला अधिकारीची वर्णी लागली आहे. महाराष्ट्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिव पदी (Chief Secretary of Maharashtra ) आयएएस अधिकारी सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक या 1987 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत.यापूर्वी त्यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याच्या मुख्य सचिवपदी कार्यभार सांभाळलेला होता.सुजाता सौनिक (Sujata Saunik) या जून 2025 पर्यंत राज्याच्या मुख्य सचिव म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
कोण आहेत सुजाता सौनिक?
सुजाता सौनिक (Sujata Saunik) या डॅशिंग आणि कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याकडे सध्या राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार आहे. त्यांना नुकतीच सचिव पदावर बढती मिळाली होती. त्यांनी सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. सार्वजनिक आरोग्यासह अन्य काही विभागातही त्यांनी काम केलं आहे.(Chief Secretary of Maharashtra )
सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांना प्रशासकीय सेवेत काम करण्याचा तीन दशकांपासूनचा अनुभव आहे. त्यांना आरोग्य सेवा, वित्त, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. सुजाता यांचे पती मनोज सौनिक हे देखील राज्याचे मुख्य सचिव होते. यानंतर त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून करण्यात आली होती.(Chief Secretary of Maharashtra )