Demands of Hindus : सरकारकडे हिंदुंच्या मागण्या काय आहेत?

102
Demands of Hindus : सरकारकडे हिंदुंच्या मागण्या काय आहेत?
Demands of Hindus : सरकारकडे हिंदुंच्या मागण्या काय आहेत?
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

आता महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. या सरकारचं वैशिष्ट्य असं आहे की हे सरकार हिंदुंच्या मतांमुळे निवडून आलं आहे. आघाडीने वोट जिहाद करण्याचं प्रोत्साहन दिलं आणि त्याविरुद्ध हिंदुंनी आवाज उठवला आणि भगवे मतदान करुन महायुतीला आश्चर्यकारक जागा मिळवून दिल्या. महाराष्ट्रात प्रचंड जातीवाद फोफावला होता. ब्राह्मण आणि सवर्णांना खलनायक ठरवण्यात आलं होतं. महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणत जातीवादी लोकांनी समाजात द्वेष निर्माण केला. या निकालाचा अर्थ असा की विविध जातीतील हिंदू एकत्र आले आणि लोकांनी या छद्म-पुरोगामी मंडळींच्या कानाखाली लगावून दिली आहे. आता हे सरकार कोणत्याही दबावाखाली न येता व्यवस्थित धोरणे राबवू शकते.

हिंदुंच्या मतांवर हे सरकार उभे असल्याने हिंदुहिताचे काही निर्णय घेणे सरकारला आवश्यक आहे. मात्र हिंदुंच्या काही मागण्या आहेत का? हाच मुळात प्रश्न आहे. कॉंग्रेसच्या स्थापनेवेळी हिंदू राजकीयदृष्ट्या हिंदी झाले. पुढे अतिरिक्त अहिंसेच्या तत्त्वाने हिंदू तत्त्व मारुन टाकले. त्यामुळे हिंदू स्वतःचा विचारच करत नाही. नोकऱ्या, विकास, चांगले रस्ते या हिंदुंच्या मागण्या आहेत. त्या असल्याच पाहिजेत. मात्र हिंदू म्हणूनही मागण्या असल्या पाहिजेत. मुस्लिम किंवा ख्रिस्ती समाजाच्या कोणत्या संघटना सरकारकडे चांगले रस्ते बांधा अशा मागण्या करतात? ते त्यांच्या धार्मिक मागण्या करतात. म्हणून हिंदुंनाही त्यांच्या हिताच्या मागण्या करता आल्या पाहिजेत. (Demands of Hindus)

(हेही वाचा – जितेंद्र आव्हाड आणि Anand Paranjape यांच्यात रंगले वाकयुद्ध; एकमेकांचा काढला बाप)

महाराष्ट्रात एम फॅक्टरमुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) २० जागा मिळवता आल्या. हे अत्यंत घातक आहे. कारण हे सगळेच मुसलमान भारतीय नाहीत, काही घुसखोर आहेत. हे जिहादी प्रवृत्तीचे आहेत. यांना भारताविषयी आपुलकी वाटत नाही. हिंदुंनी सरकारकडे मागणी केली पाहिजे की रोहिंग्या, बांगलादेशी अशा घुसखोर मुसलमानांना भारतातून त्यांच्या मायदेशी पाठवले जावे. कारण अनधिकृतपणे राहणाऱ्या या जिहाद्यांमुळे देशाचं वाटोळ होत आहे. ठिकठिकाणी दंगली सदृश वातावरण निर्माण होत आहे. दुसरी गोष्ट अनधिकृत धार्मिक स्थळे, मजार यांचा बंदोबस्त व्हायला हवा. रस्त्यावर स्टॉल लावून जागा अडवणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. हे फेरीवाले भारतीय आहेत की बांगलादेशी हे पाहिले पाहिजे. सरकारने हिंदुंना संरक्षण द्यावे अशी मागणीही करायला हवी. म्हणजे हिंदुंच्या धार्मिक मिरवणुकींवर हे जिहादी दगडफेक करतात, शांतता भंग करतात, या प्रकरणांमध्ये हिंदुंचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान होते. त्याची भरपाई सरकारने या जिहाद्यांकडून वसूल करावी. जे दगडफेक किंवा इतर प्रकारे इजा पोहोचवतील त्यांची घरे जमीनदोस्त करावीत, तसेच ज्यांना इजा पोहोचली आहे. अशा लोकांना १ लाख रुपये भरपाई जिहाद्यांकडून वसूल करावी. जेणेकरुन जिहादी कृत्य बंद पडतील. (Demands of Hindus)

अशा अनेक मागण्या हिंदू या सरकारकडे करु शकतात. सर्वात आधी रोहिंग्या, बांगलादेशी मुसलमानांना हाकलून देण्याची व त्यांना संरक्षण देणाऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना पत्रे पाठवून करायला हवी. घुसखोर जिहादी या देशातून निघून गेले तर आपल्या देशाची खूप मोठी समस्या संपुष्टात येईल. मग तुम्ही तयार आहात ना मागण्या करायला?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.