-
ऋजुता लुकतुके
भारताचा आव्हानवीर डी गुकेश आणि चीनचा जगज्जेता डिंग लिरेन यांच्यात सिंगापूर इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत सहावा डावही बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे १४ डावांची अंतिम फेरी सध्या ३-३ अशी बरोबरीत आहे. पण, आतापर्यंतचा खेळाचा अंदाज घेतला तर सहाव्या फेरीनंतर जगज्जेता डिंग लिरेन हा आत्मविश्वासपूर्ण चाली रचताना दिसतो आहे. गुकेशला कोंडीत पकडतो आहे. शेवटच्या दोन डावांमध्ये अगदी शेवटच्या क्षणी गुकेशने आपली पराभवातून सुटका करून घेतली. (World Chess Champions 2024)
(हेही वाचा- Demands of Hindus : सरकारकडे हिंदुंच्या मागण्या काय आहेत?)
३२ वर्षीय डिंग लिरेनने लढतीतील पहिला डाव जिंकला होता. तर गुकेशने तिसरा जिंकला. इतर चार लढती बरोबरीत सुटल्या आहेत. सहाव्या डावात ४६ व्या चालीवर दोघांनी बरोबरी मान्य केली. त्यापूर्वी लिरेनने दिलेला बरोबरीचा प्रस्ताव एकदा गुकेशने नाकारला होता. (World Chess Champions 2024)
Match score after Game 6 of the FIDE World Championship Match, presented by Google, is 3-3.
Game 6 lasted over 4 hours and concluded in the draw after 46 moves. #DingGukesh pic.twitter.com/K5rf3tH346
— International Chess Federation (@FIDE_chess) December 1, 2024
सहाव्या डावात लिरेनकडे पांढरे मोहरे होते. त्याने लंडन ब्रिट्झक्रिग पद्धतीने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या २० चालींसाठी त्याने फक्त ७ मिनिटं घेतली. त्यामुळे डावाच्या मध्यावर पटावर दोघांच्या राण्या, हत्ती आणि एकसमान प्यादी अशी स्थिती होती. तेव्हा पहिल्यांदा लिरेनने गुकेशला बरोबरीचा प्रस्ताव दिला. पण, गुकेशने तो नाकारल्यावर जाणकारांनाही आश्चर्य वाटलं. गुकेशने उलट एकमेकांच्या राण्या मारण्याची चाल रचली. संगणकावर तेव्हा लिरेन काहीसा पुढे असल्याचं दिसत होतं. पण, गुकेशने खेळ रेटून पुढे नेला. (World Chess Champions 2024)
त्यानंतर लिरेनने सतत बरोबरीचेच प्रयत्न केले. पुढे राजासमोरचं प्यादंही त्याने असंच गुकेशसमोर सरकवलं. ते मारण्यावाचून गुकेशकडे पर्याय उरला नाही. लिरेननेही पटावर बरोबरी कायम ठेवली. इंग्लिश ग्रॅडमास्टर डेव्हिड हॉवेल यांच्या मते दोघांच्या राण्या पटावर असताना म्हणजे डावाच्या मध्यावर लिरेनकडे बाजी मारण्याची चांगली संधी होती. पण, लिरेनने ती जाऊ दिली. तर गुकेश आक्रमणाच्या नादात मध्यावर काही चुका करतो आहे. त्याचा फायदा अजून तरी लिरेनला घेता आलेला नाही. (World Chess Champions 2024)
(हेही वाचा- Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील निवडणुकांचा अन्वयार्थ)
पण, दोघांच्या खेळांचा तौलनिक अभ्यास केला तर लिरेनने शेवटच्या दोन डावांमध्ये गुकेशला कायम कोंडींत पकडलं आहे. पण, गुकेशने आपली सुटका करून घेतली आहे. पण, सध्या लिरेनचा खेळ सरस होतोय. प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणण्यात तो यशस्वी होतोय. आता एका दिवसाच्या विश्रांतीनंतर सातवा डाव पुन्हा सुरू होईल. ७.५ गुण सर्वप्रथम मिळवणारा खेळाडू विजेता ठरेल. आणखी ८ डाव बाकी आहेत. (World Chess Champions 2024)