Cyclone Fengal: ‘फेंगल’मुळे जनजीवन विस्कळीत; वादळाचा जोर ओसरला

77
Cyclone Fengal: ‘फेंगल’मुळे जनजीवन विस्कळीत; वादळाचा जोर ओसरला
Cyclone Fengal: ‘फेंगल’मुळे जनजीवन विस्कळीत; वादळाचा जोर ओसरला

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे (Cyclone Fengal) रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुद्दुचेरीमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळ (Puducherry) स्थिर झाले असून त्याची गती हळूहळू कमी होईल, अशी माहिती विभागाने दिली. रविवारी सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. सरकारने सखल भागातून सुरक्षित बाहेर काढलेल्या नागरिकांसाठी मदत केंद्र स्थापन केले आहे. (Cyclone Fengal)

हेही वाचा- Railway News : ‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद राहणार, काय आहे कारण ?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुद्दुचेरीमध्ये रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत ४६ सेमी पावसाची नोंद झाली. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे बुलीवर्ड हद्दीतील सर्व निवासी भाग पाण्याखाली गेले. चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. (Cyclone Fengal)

हेही वाचा- Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला ? नावाची घोषणा कधी होणार ? वाचा सविस्तर…

तामिळनाडूत विल्लूपुरम (Villupuram) जिल्ह्यात ९ तासांत ५० सेंमी पाऊस पडला. काही स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३० वर्षांनंतर पुड्डुचेरीत पाऊस किंवा वादळामुळे अशी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. मात्र, आता हळूहळू वादळाचा जोर ओसरायला सुरूवात झाली आहे. (Cyclone Fengal)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.