Mahakal Temple: महाकाल मंदिरात आता ATM सारख्या मशीनमधून लाडू प्रसाद मिळणार; पेमेंट कसे होणार?

63
Mahakal Temple: महाकाल मंदिरात आता ATM सारख्या मशीनमधून लाडू प्रसाद मिळणार; पेमेंट कसे होणार?
Mahakal Temple: महाकाल मंदिरात आता ATM सारख्या मशीनमधून लाडू प्रसाद मिळणार; पेमेंट कसे होणार?

भगवान महाकालच्या (Mahakal Temple) भक्तांना उज्जैनमध्ये (Ujjain) मोठी सुविधा मिळाली आहे. यापुढे भाविकांना प्रसादासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. एटीएम व्हेंडिंग मशीनद्वारे भाविकांना प्रसाद सहज घेता येणार आहे. आधुनिक मशीनचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J.P. Nadda) आणि मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव (Dr. Mohan Yadav) यांच्या हस्ते करण्यात आले. महाकालेश्वर मंदिरात वेद स्तोत्रांच्या गजरात लाडू प्रसाद वेंडिंग एटीएम मशीनचे उद्घाटन करण्यात आले. (Mahakal Temple)

हेही वाचा-  Cyclone Fengal: ‘फेंगल’मुळे जनजीवन विस्कळीत; वादळाचा जोर ओसरला

महाकालेश्वर मंदिरात क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर मशीनमधून प्रसादाच्या लाडूचे पॅकेट बाहेर येईल. मंदिर समितीने कोईम्बतूरच्या 5G तंत्रज्ञान कंपनीला ऑटोमॅटिक मशीन मागवले होते. भाविकांना मशीनमधून 100 ग्रॅम, 200 ग्रॅम आणि 500 ​​ग्रॅम लाडूची पाकिटे मिळू शकतील. देशातील इतर कोणत्याही मंदिरात सध्या हायटेक सुविधा उपलब्ध नाही. महाकालेश्वर मंदिरात व्यवस्थापन समितीचे लाडू प्रसाद उत्पादन युनिट आहे. (Mahakal Temple)

हेही वाचा- Railway News : ‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद राहणार, काय आहे कारण ?

महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीचे लाडू प्रसाद हे 2021 मध्ये 5 स्टार रेटिंग मिळवणारी पहिली धार्मिक संस्था असल्याचे सांगण्यात आले आहे. महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीला भारत सरकारच्या FSSAI कडून सुरक्षित भोग स्थळाचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. महाकालेश्वर मंदिरात दरवर्षी भाविक ५० कोटींहून अधिक किंमतीचा प्रसाद घेतात. एटीएम मशीन सुरू झाल्याने भाविकांना लाडूचा प्रसाद घेणे सोयीचे झाले आहे. (Mahakal Temple)

एका वेळी 130 पॅकेट ठेवण्याची क्षमता
5g कंपनीचे बिझनेस हेड एम कन्नन म्हणाले की, मशीन सुरू होण्यासाठी सुमारे दोन-तीन दिवस लागतील. सोमवारी ते बँकेशी जोडले जाणार आहे. यानंतर 100 ग्रॅमपासून 500 ग्रॅम, 200 ग्रॅम, 1 किलोपर्यंतची पॅकेट्स ठेवली जातील. आता बसवलेल्या मशीनमध्ये एकावेळी 130 पॅकेट ठेवण्याची क्षमता असेल, त्यानंतर मशीन पुन्हा भरावी लागेल. (Mahakal Temple)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.