Indian Navy Submarine Collision : समुद्रात नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी बोटीची धडक; २ खलाशांचा मृत्यू

134
Indian Navy Submarine Collision : समुद्रात नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी बोटीची धडक; २ खलाशांचा मृत्यू
Indian Navy Submarine Collision : समुद्रात नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी बोटीची धडक; २ खलाशांचा मृत्यू
अरबी समुद्रात मासेमारी बोट आणि नौसेनाची पाणबुडी यांची धडक होऊन दोन खलाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या धडकेत नौसेनाच्या पाणबुडीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मासेमारी बोटीवरील तांडेल विरोधात यलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोटीवरील दोन्ही खलाशांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन जेजे रुग्णालय येथे पाठविण्यात आले असून मृतदेहाची ओळख पटविण्यात येत आहे. ही धडक गोवा जवळील अरबी समुद्रात रात्रीच्या सुमारास झाली. (Indian Navy Submarine Collision)
मुंबईतील यलो गेट पोलीस ठाण्यात रविवारी दाखल झालेल्या प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नुसार कारवार कर्नाटक येथून नौसेनाची आय.एन.एस. करंज ही पाणबुडी २१नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पैरीस्कोप डेप्थ (Periscope Depth) मेंटेन करुन गोवा राज्याच्या समुद्र तटाजवळून दक्षिण पूर्व (१५४ डिग्री) दिशेने ६ नॉट्स वेगाने जात होती, दरम्यान पाणबुडीच्या उजव्या बाजुस (Starboard bow) एक मासेमारी बोट दोन ते तीन किलोमीटर अंतरावर  दिसून आली, सदर मासेमारी बोट एका जागेवर उभी होती व तिच्या लाईट्स फार अंधुक असल्यामुळे बोट स्पष्ट दिसत नव्हती, मासेमारी बोट  ऑटोमेटीक आयडेर्डेन्टीफिकेषन सिस्टम (AIS) वर (Transmit) करत नव्हती. त्यामुळे सदर मासेमारी बोटीचे स्पीड, लोकेशन, दिशा व नाव समजुन येत नव्हते. सदर मासेमारी बोटीचे प्रकाश लाईट अंधुक असल्याने तसेच AIS वर Transmit करत नसल्याने सदर बोट टॅकींग करणे अवघड होते. (Indian Navy Submarine Collision)
भारतीय नौसेनेचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत सिंग यांनी प्रथम खबरी अहवालात दिलेल्या माहितीनुसार पाणबुडीच्या सोनार (SONAR) वर एफ. व्ही मारयोमा मासेमारी बोट दिसून (डिटेक्ट) आली. सोनार सिस्टीम ही पाण्यावरील तसेच पाण्याखालील वस्तु (contacts/Objects) आवाजाच्या (Sound Energy) सहाय्याने डिटेक्ट करण्यासाठी वापरण्यात येथे असे सिंग यांनी म्हटले आहे, ते पुढे म्हणाले, एफ. व्ही. मारथोमा मासेमारी बोटीने अचानक वेग वाढवून ती आमच्या बोटीजवळ येवु लागली. सदरवेळी ऑफीसर ऑफ द वाँच (OOW) यांनी दोन्ही बोटीमधील अंतर सुरक्षित करण्यासाठी आमच्या पाणबुडीचा वेग वाढवून दिशा बदलली. परंतु एफ. व्ही. मारथोमा ही मासेमारी बोट आमच्या दिशेने वेगात येवुन  पाणबुडीला धडकली. पाणबुडीने मासेमारी बोटीपासुन वाचण्याचे सर्व प्रयत्न करुनही ती मासेमारी बोट पाणबुडीला धडकली आणि समुद्रात पलटी होवुन बुडाली.पाणबुडीचे कमांडिंग ऑफीसर अरुनाभ यांनी झालेल्या घटनेबाबत ताबड़तोड सॅटेलाईट कम्युनिकेशन द्वारे नेव्हल हेडक्वाटर्स यांना कळवुन मदत मागवली. पाणबुडीवरील अधिकारी यांनी बुडालेल्या बोटीवरील खलाश्यांच्या बचावाकरीता बचाव मोहिम (Rescue Operation) सुरु केली. त्यानंतर काही वेळाने इंडियन नेव्हीचे एक जहाज बचाव कार्याच्या मदतीकरीता आले. (Indian Navy Submarine Collision)
पाणबुडीच्या पुढील आगात डिझेल व ऑईल जमा होवून सदर भाग गुळगुळीत (Slippery) झाला होता. अशा अवघड परिस्थीतही पाणबुडीवरील काही कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालुन समुद्रात बुडत असलेल्या ५ खलाश्यांना वाचवले. तसेच उर्वरीत ६ खलाशी हे पोहत जावून जवळील मासेमारी बोटीवर चढले होते. त्यांचाही शोध घेवुन त्यांना मदतीसाठी आलेल्या नौसेनेच्या जहाजावर पाठविण्यात आले. बुडालेल्या मासेमारी बोटीतील खलाश्यांना सुखरुप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. (Indian Navy Submarine Collision)
एफ. व्ही. मारथोमा या बुडालेल्या बोटीवरील दोन हरविलेल्या खलाश्यांच्या शोध मोहिम राबवितांना दोन्हीही खलाशी यांचे मृतदेह मिळुन आले असून हे मृतदेह यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नौसेनेच्या पाणबुडी जवळपास १० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती नौसेनेचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत सिंग यांनी म्हटले आहे.  एफ. व्ही. मारथोमा या मासेमारी बोटीवरील तांडेल यांनी त्याचा बोटीचा गती वाढवुन आय.एन.एस. करंज या पाणबुडीच्या वरील दर्शनी भागातील रडार, कम्यूनिकेशन अॅड पेरीस्कोप असा दोन ते तीन मीटर भाग दिसत असुनही मारथोमा बोटीची गती वाढवुन त्याच्या ताब्यातील बोट बेदरकारपणे व निष्काळजीपणाने चालवुन नौसेनेच्या पाणबुडीचे झालेले नुकसान आणि ११ खलाशांचा दुखपतीला आणि दोन खलाशाच्या मृत्यूला कारणीभूत असल्यामुळे मासेमारी बोटीवरील तांडेल विरुद्ध यलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (Indian Navy Submarine Collision)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.