हिंदुत्वासाठी जीवन समर्पित करणारे Vikram Rao Savarkar

106
हिंदुत्वासाठी जीवन समर्पित करणारे Vikram Rao Savarkar
हिंदुत्वासाठी जीवन समर्पित करणारे Vikram Rao Savarkar
मनोज कुवर, भगूर, नाशिक

विक्रमराव नारायणराव सावरकर (Vikram Rao Savarkar) हे केवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे (Veer Savarkar) नातेवाईक म्हणूनच नव्हे, तर हिंदुत्व विचारसरणीचे प्रखर समर्थक, संघटनकर्ते आणि समाजसेवक म्हणून भारतीय इतिहासात अजरामर ठरले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, विक्रमरावांनी संपूर्ण आयुष्य हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आणि समाज सुधारण्यासाठी समर्पित केले. हिंदूमहासभेचे ज्येष्ठ नेते तथा सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक सदस्य कै. श्री. विक्रमराव नारायणराव सावरकर यांची २ डिसेंबर रोजी जयंती आहे. त्यानिमित्त विनम्र अभिवादन…!

(हेही वाचा – Indian Navy Submarine Collision : समुद्रात नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी बोटीची धडक; २ खलाशांचा मृत्यू)

युवकांमध्ये राष्ट्रसेवेचा आदर्श

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर आधारित विक्रमराव सावरकरांनी हिंदू महासभेच्या (Hindu Mahasabha) अध्यक्षपदाची जबाबदारी १९८० ते १९८७ या सात वर्षांच्या काळात समर्थपणे पार पाडली. या काळात त्यांनी हिंदू एकत्रीकरणासाठी आणि समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व्यापक मोहीमा उभ्या केल्या. विक्रमरावांचे नेतृत्व नेहमीच प्रगल्भ आणि तत्त्वनिष्ठ राहिले.

विक्रमराव सावरकरांनी महाराष्ट्र मिलिटरी स्कूल (Maharashtra Military School), मुरबाड या संस्थेची स्थापना केली. ही सैनिकी शाळा स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या अंतर्गत सुरू करण्यात आली. आजही या शाळेतून विद्यार्थी शासकीय सेवेत, भारतीय सैन्यात, तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. या शाळेच्या स्थापनेमुळे विक्रमरावांनी युवकांमध्ये राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला.

आदर्श कर्मयोगी

विक्रमराव सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘मनस्वी’ हे पुस्तक अनुराधा व. खोत यांनी लिहिले आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातून विक्रमरावांच्या जीवनातील तपश्चर्या, कष्ट आणि समाजसेवा यांचे दर्शन होते.

हे केवळ नेते नव्हते, तर एक आदर्श कर्मयोगी होते. त्यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आणि संघटनासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या विचारांची आणि कृतीशीलतेची आजच्या समाजाला फार मोठी गरज आहे.

अशा या महान विभूतीस विनम्र अभिवादन. त्यांचे कार्य आणि विचार नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. हिंदुत्वासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला कधीही विसरता येणार नाही. (Vikram Rao Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.