-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर चषकात भारताचा पुढील सामना ६ डिसेंबरला ॲडलेडला होणार आहे. पण, ही दिवस – रात्र कसोटी असल्यामुळे गुलाबी चेंडूच्या या कसोटीत भारतीय संघात काही धोरणात्मक बदल होऊ शकतात. दिवस – रात्र कसोटी हे वेगळं आव्हान आहे. त्यामुळे प्रकाश झोतात फलंदाजी करण्याचं कसब आणि गुलाबी चेंडूने गोलंदाजी करण्याचं कसब असलेले खेळाडू संघात येऊ शकतात. तसंच वातावरणातील बदलांशीही खेळाडूंना जुळवून घ्यावं लागतं. (Rohit Sharma)
त्यादृष्टीने फलंदाजांच्या क्रमवारीत नेमके कुठले बदल संभवतात यावर आता चर्चा सुरू झाली आहे. त्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो कर्णधार रोहित शर्मा कुठल्या क्रमांकावर फलंदाजीला येणार. सलामीला मोठी धावसंख्या रचण्यात येणारं अपयश आणि चुकीचे फटके खेळण्याची सवय यामुळे हा प्रश्न चर्चेला आला आहे. त्यातच पर्थ कसोटीत के. एल. राहुल आणि यशस्वी जयसवाल यांनी सलामीला २०१ धावांची भागिदारी रचली आहे. त्यामुळे ही जमलेली जोडी फोडायची का हा दुसरा प्रश्न संघ प्रशासनासमोर आहे. (Rohit Sharma)
(हेही वाचा- Uttar Pradesh मधील आणखी एका मशिदीखाली आहे शिवमंदिर)
कॅनबेरा इथं सराव सामन्यात रोहित चौथ्याच क्रमांकावर फलंदाजीला आला. पण, तो जेमतेम ११ चेंडू टिकला. ३ धावा करून माघारी परतला. त्यामुळे ही चर्चा जोरदार सुरू झाली आहे. दिवस – रात्र कसोटीत दुपारच्या सत्रात फलंदाजी करणं हे सगळ्या आव्हानात्मक मानलं जातं. अंधार पडायला सुरुवात झालेली असते. कृत्रिम प्रकाशझोत अर्धवट सुरू झालेले असतात. अशावेळी वातावरणाशी जुळवून घेणं कठीण असतं. रोहित जर सलामीला न येता मधल्या फळीत आला तर तो आपले नेहमीचे फटके अधिक सहजतेने मारू शकेल असा एक अंदाज आहे. (Rohit Sharma)
पंतप्रधानांच्या संघाविरुद्ध नाणेफेकीच्या वेळी जेव्हा संघ झाहीर झाला तेव्हा विराटचं नाव चौथ्या क्रमांकावर आणि रोहितचं नाव पाचव्या क्रमांकावर होतं. ॲडलेडमध्येही तेच कायम राहील असा आणखी एक अंदाज आहे. कॅनबेरामध्ये जयसवालने नेहमीच्या सहजतेनं ४५ धावा केल्या. तर राहुल २७ धावांवर नाबाद तंबूत परतला. इतरांना फलंदाजीचा सराव मिळावा हाच त्यामागे उद्देश होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील वातावरणात ही जोडी जमून आल्याचं दिसत आहे. अशावेळी विनाकारण या जोडीत फेरफार करणंही कितपत योग्य हा प्रश्न आहेच. (Rohit Sharma)
(हेही वाचा- Cyclone Fengal: ‘फेंगल’मुळे जनजीवन विस्कळीत; वादळाचा जोर ओसरला)
पर्थ कसोटीत रोहित शर्मा संघाबरोबर नव्हता. त्यामुळे के. एल. राहुलला संघात स्थान मिळालं. पण, सध्या त्याने ते भक्कम केलेलं दिसत आहे. किमान ॲडलेड कसोटीत तरी राहुल आणि जयसवाल हीच जोडी सलामीला येण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे रोहितला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागू शकते. (Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community