Plastic Pollution च्या आव्हानावर तोडगा काढणे आवश्यक; भारताचे आयएनसी-5 मध्ये आवाहन

41
Plastic Pollution च्या आव्हानावर तोडगा काढणे आवश्यक; भारताचे आयएनसी-5 मध्ये आवाहन
Plastic Pollution च्या आव्हानावर तोडगा काढणे आवश्यक; भारताचे आयएनसी-5 मध्ये आवाहन

दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित आंतरशासकीय वाटाघाटी समितीच्या (Intergovernmental Negotiating Committee, आयएनसी-५) पाचव्या अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये भारताने आपली ठोस भूमिका मांडली. प्लास्टिक प्रदूषणाचे (Plastic Pollution) आव्हान आणि त्याची व्यापक तीव्रता याची जाणीव करून देत या समस्येवर कोणत्याही एका राष्ट्राला स्वतंत्रपणे संपूर्ण तोडगा काढता येणार नाही, असे भारताने यावेळी नमुद केले. तसेच दोन वर्षांपूर्वी यूएनईए- ५ मध्ये आपण सर्वांनी एकत्र येण्याचा आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक साधन विकसित करण्याचा संकल्प केला,” असे भारताने आपल्या या संदर्भातल्या निवेदनात नमूद केले आहे.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा ॲडलेडमध्ये मधल्या फळीतच खेळणार का?)

यावेळी अध्यक्ष आणि सचिवालयाने आयएनसी-५ मध्ये सहमती आधारित निष्कर्ष साध्य करण्यासाठी प्रयत्न केल्याने भारताने त्यांचे आभार मानले आणि कौतुक केले.

भारताची एकूण लोकसंख्या १.४ अब्ज आहे. या लोकसंख्येची प्लास्टिक प्रदूषणाशी लढण्याप्रति जबाबदारी आहे हे आपण जाणतो, असे भारताने यावेळी म्हटले आहे. प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी भारताने आधीच अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये एकदा वापरण्याच्या प्लास्टिक उत्पादनांवर बंदी आणि प्लास्टिक वेष्टनांसाठी महत्त्वाकांक्षी आणि ठोस विस्तारित उत्पादक जबाबदारी (ईपीआर) यंत्रणा लागू करणे यांचा यामध्ये समावेश असल्याचे भारताने सांगितले. तसेच प्लास्टिकचा आपल्या समाजांच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही, असे हि भारताने नमुद केले.

भारताने विकसनशील अर्थव्यवस्थांच्या शाश्वत विकासाला धक्का पोहचणार नाही याकडे लक्ष देऊन पर्यावरणात संतुलन साधने हे एक कठीण काम असल्याचे भारताने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या कामासाठी परस्पर विश्वास आणि एकमेकांच्या परिस्थितीची समज असणे सुद्धा आवश्यक आहे. या संदर्भातील सर्व निर्णयांचा विचार करुन कायदेशीर करारातील दुरुस्त्या आणि त्याची परिशिष्टे, सहमतीच्या आधारेच असावीत, यावर भारताने यावेळी भर दिला. भारताने अध्यक्षांचे अद्ययावत `चर्चेच्या मुद्द्यांचा दस्तावेज `सादर केल्याबद्दल आभार मानले. “या दस्तावेजावर भारताची काही निरीक्षणे आहेत, परंतु आम्ही त्यावर पुढील चर्चेसाठी तयार आहोत,” असेही भारताने यावेळी म्हटले.

निवेदनाचा समारोप करताना भारताने अध्यक्षांना आयएनसी-5 च्या बैठकीच्या अहवालात आपले निवेदन समाविष्ट करण्याची विनंतीही केली. (Plastic Pollution)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.