Virat Kohli : सराव सामना चुकवून विराटने केला बुमराह, अश्विनच्या गोलंदाजीवर जोरदार सराव

Virat Kohli : सराव सामन्यात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताने ५ गडी राखून विजय मिळवला

54
Virat Kohli : सराव सामना चुकवून विराटने केला बुमराह, अश्विनच्या गोलंदाजीवर जोरदार सराव
Virat Kohli : सराव सामना चुकवून विराटने केला बुमराह, अश्विनच्या गोलंदाजीवर जोरदार सराव
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ आता ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ॲडलेड दिवस – रात्र कसोटीची कसून तयारी करत आहे. संघातील प्रमुख खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी तर सराव सामन्यातून विश्रांती घेऊन संध्याकाळच्या सत्रात नेट्समध्ये सराव करण्याचं धोरण ठेवलं. मुख्य मैदानाजवळच्या नेट्समध्ये जसप्रीत बुमराह आणि अश्विन यांनी पूर्ण क्षमतेनं गोलंदाजी केली. विराट कोहली फलंदाजीचा सराव करताना दिसला.  (Virat Kohli)

(हेही वाचा- Maha kumbh Mela 2025 : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा; कशी सुरु आहे तयारी)

दोघांच्या गोलंदाजीला खेळताना विराट सहजसुंदर खेळत होता. महत्त्वाचं म्हणजे त्याचा बचावही भक्कम दिसला. तिघांचाही नेट्समधला एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यात बुमराह आपल्या नेहमीच्या रनअपमध्ये आणि वेगाने चेंडू टाकताना दिसत आहे. तर विराट त्याला बचावात्मक पद्धतीने खेळत आहे. आधी बुमराह आणि मग अश्विनची गोलंदाजीही विराटने खेळून काढली. जसप्रीत बुमराह आणि विराटने पर्थ कसोटीत भारतीय विजयात मोलाची भूमिका बजावली होती. आता दोघंही खेळाडू दिवस – रात्र कसोटीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. (Virat Kohli)

दिवस – रात्र कसोटीत गुलाबी चेंडूशी जुळवून घेणं हे पहिलं आव्हान असतं. दुसरं आव्हान दुपारनंतर संध्याकाळच्या सत्रात फलंदाजी करणं हे असतं. त्या दृष्टीने विराट आणि बुमराह, अश्विन यांनी एकदा सकाळी आणि नंतर संध्याकाळच्या सत्रात सराव केला. याआधी भारतीय संघ ॲडलेड इथंच दिवस रात्र कसोटी खेळला आहे. भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी रवीचंद्रन अश्विनने त्या सामन्यात डावांत ५ बळी घेतले होते. दिवस – रात्र कसोटीचा अनुभव असलेले भारतीय संघातील हे दोन गोलंदाज आहेत. त्यामुळे आताही ॲडलेडमध्ये त्यांचं खेळणं नक्की मानलं जात आहे. (Virat Kohli)

(हेही वाचा- Blocked URLs : केंद्र सरकारने ब्लॉक केले २८ हजार URL; नेमकं कारण काय ?)

दरम्यान कॅनबेरा इथं झालेल्या सराव सामन्यात शुभमन गिल, के. एल. राहुल, यशस्वी जयसवाल आणि नितिश रेड्डी तसंच वॉशिंग्टन सुंदर यांनाही फलंदाजीत आपली चमक दाखवली आहे. तर गोलंदाजी तेज गोलंदाज हर्षित राणा चमकला. (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.