-
ऋजुता लुकतुके
भारताचा २१ वर्षीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसीने कारकीर्दीत एक महत्त्वाचा टप्पा गाठताना २,८०० एलो गुण कमावले आहेत. विश्वनाथन आनंद नंतर ही मजल मारणारा अर्जुन केवळ दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. जागतिक क्रमवारीतही अर्जुन सध्या चौथ्या स्थानावर आहे. एकूणच २०२४ हे वर्ष अर्जुनसाठी यशदायी ठरलं आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतही अर्जुनने वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण कमावण्याबरोबरच सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्ण मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. (Arjun Erigaisi)
(हेही वाचा- Champions Trophy 2024 : चॅम्पियन्स करंडकचं अखेर ठरलं, पाकिस्तान हायब्रीड मॉडेलसाठी तयार)
आताही २,८०० एलो गुण मिळवणारा जागतिक स्तरावरही तो फक्त १६ वा ग्रँडमास्टर ठरला आहे. बुद्धिबळाची जागतिक संघटना फिडेनंही अर्जुनविषयी कौतुकपर ट्विट केलं आहे. ‘क्लासिक बुद्धिबळात २,८०० एलो रेटिंग पार करणारा अर्जुन एरिगसी फक्त १६ वा खेळाडू आहे. तर या यादीत पोहोचणारा विश्वनाथन आनंद नंतरचा तो दुसरा भारतीय आहे. त्याचं अभिनंदन!’ असं फिडेनं आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Arjun Erigaisi)
🇮🇳 Arjun Erigaisi has become the 16th player in history to break the 2800 Elo barrier in classical chess ratings!@ArjunErigaisi joins five-time World Champion Viswanathan Anand as the second Indian to achieve this milestone. In the December 2024 #FIDERating list, his rating… pic.twitter.com/fBZKDoVoiC
— International Chess Federation (@FIDE_chess) December 1, 2024
तेलंगाणाच्या वारंगलमधून आलेला अर्जुन एरिगसी वयाच्या १४ व्या वर्षी ग्रँडमास्टर बनला होता. तर सप्टेंबर २०२४ मध्ये त्याने विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा क्रमवारीतील सगळ्यात अव्वल खेळाडू होण्याचा मान पटकावला. आनंद तेव्हा जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर होता. (Arjun Erigaisi)
(हेही वाचा- Virat Kohli : सराव सामना चुकवून विराटने केला बुमराह, अश्विनच्या गोलंदाजीवर जोरदार सराव)
अरिगसीकडे सध्या २,८०१ एलो रेटिंग गुण आहेत. जागतिक क्रमवारीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. स्वीडनचा मॅग्नस कार्लसन (२८३१) अव्वल स्थानावर आहे. तर त्याच्या खालोखाल असलेल्या अमेरिकेच्या फाबिआने कारुआनाकडे २,८०५ एलो गुण आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या हिकारु नाकामुराकडे २,८०२ गुण आहेत. त्याखालोखाल अर्जुन एरिगसी आहे. भारताचा डी गुकेश एरिगसीच्या खालोखाल पाचव्या क्रमांकावर आहे. गुकेश सध्या जगज्जेतेपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनशी मुकाबला करत आहे. डिंग लिरेन जगज्जेता असला तरी वर्षभऱ स्पर्धा खेळलेला नसल्यामुळे जागतिक क्रमवारीत २२ व्या क्रमांकावर घसरला आहे. (Arjun Erigaisi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community