-
ऋजुता लुकतुके
रविवारी १ डिसेंबरपासून बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांनी आयसीसीचा कारभार हाती घेतला आहे. नोव्हेंबरमध्येच जय शाह या पदावर बिनविरोध निवडून आले होते. पदावर नियुक्ती झाल्या झाल्या त्यांनी आयसीसीसमोर क्रिकेटच्या जागतिक प्रसाराचा एक कार्यक्रमच ठेवला आहे. २०२८ चं लॉस एंजिलिस ऑलिम्पिक हे क्रिकेटसाठी पहिलं मोठं व्यासपीठ असल्याचं सांगत त्यांनी खेळाडू आणि चाहते यांना खेळाचा जास्त चांगला अनुभव कसा मिळेल यावर काम करणार असल्याचं म्हटलं आहे. (Jay Shah ICC President)
(हेही वाचा- Virat Kohli : सराव सामना चुकवून विराटने केला बुमराह, अश्विनच्या गोलंदाजीवर जोरदार सराव)
त्याचबरोबर कामाच्या पहिल्या दिवशी त्यांनी अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आयसीसीचे संचालक आणि सदस्य देशांची क्रिकेट मंडळं यांचे आभार मानले आहेत. ‘आयसीसीा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ सुरू करताना मला क्रिकेट संचालक आणि सदस्य मंडळांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन,’ असं शाह म्हणाले आहेत. त्याचबरोबर क्रिकेटच्या तीनही प्रकारांसाठी समान प्रयत्न करण्याचं वचन आणि महिला क्रिकेटच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (Jay Shah ICC President)
‘येणारा काळ हा क्रिकेटसाठी भरपूर संधींनी भरलेला आणि त्याचबरोबर आव्हानात्मक आहे. एलए २८ ही क्रिकेटसाठी खूप मोठी संधी आहे. खेळाची व्याप्ती त्यातून वाढणार आहे. आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. ती संधी दोन्ही हातांनी घ्यायची आहे. शिवाय, क्रिकेटचे तीनही प्रकार हातात हात घालून एकत्र नांदतील हे आपल्याला बघायचं आहे. तसंच महिला क्रिकेटचा विस्तार करायचाय. हे सगळं शक्य करून दाखवायचं आहे,’ असं जय शाह यांनी आपल्या कार्यक्रमात नमूद केलं आहे. (Jay Shah ICC President)
A new chapter of global cricket begins today with Jay Shah starting his tenure as ICC Chair.
Details: https://t.co/y8RKJEvXvl pic.twitter.com/Fse4qrRS7a
— ICC (@ICC) December 1, 2024
अध्यक्ष म्हणून कामकाज सुरू केल्यावर शाह यांच्यासमोर पहिलं आव्हान असणार आहे ते चॅम्पियन्स करंडक सुरळीत पार पाडण्याचं. कारण, पाकिस्तान हायब्रीड मॉडेलसाठी तयार असलं तरी त्यांच्या काही अटीही आहेत. त्यावर तोडगा अजून निघालेला नाही. (Jay Shah ICC President)
३६ वर्षीय जय शाह २०१९ पासून क्रिकेटच्या प्रशासनात सक्रिय आहेत. गुजरात क्रिकेट असोसिएशनपासून सुरुवात केल्यानंतर २०१९ मध्ये ते पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव झाले. बीसीसीआयचे ते सगळ्यात कमी वयाचे सचिव आहेत. त्यानंतर आता त्यांची आयसीसीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ४ वर्षं आयसीसीमध्ये राहिल्यामुळे जय शाह यांना बीसीसीआयच्या प्रशासनातही मदत मिळणार आहे. कारण, नवीन नियमांनुसार, सलग दोन प्रशासकीय कार्यकाळांनंतर तुम्हाला मध्ये ४ वर्षांची विश्रांती घ्यावी लागते. (Jay Shah ICC President)
(हेही वाचा- Mumbai Manchester Gulf Air Flight चे कुवैतमध्ये आपत्कालीन लँडिंग; भारतीय प्रवासी १३ तास कुवैतमध्ये अडकले)
जय शाह बीसीसीआयमध्ये आधी कोषाध्यक्ष होते. आता सचिव आहेत. त्यामुळे त्यांचे दोन कार्यकाळ संपले आहेत. इथून पुढे ४ वर्षं त्यांना बीसीसीआयमध्ये कुठलीही भूमिका निभावता येणार नव्हती. त्या कालावधीत आता ते आयसीसीमध्ये कार्यरत असतील. पुन्हा चार वर्षांनी बीसीसीआयमध्ये परतू शकतील. (Jay Shah ICC President)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community