wockhardt hospital mumbai central मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि इथे कसे पोहोचाल?

52
wockhardt hospital mumbai central मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि इथे कसे पोहोचाल?

wockhardt hospital ची थोडक्यात माहिती

wockhardt hospital ची स्थापना १९७३ साली झाली. या हॉस्पिटल्सना मूलतः फर्स्ट हॉस्पिटल्स आणि हार्ट इन्स्टिट्यूट असं म्हटलं जातं. wockhardt hospital हे भारतातलं सुपर स्पेशालिटी हेल्थकेअर नेटवर्क आहे. हे सर्व हॉस्पिटल्स wockhardt लिमिटेड नावाची भारतातली ५वी सर्वांत मोठी फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर कंपनी चालवते.

मुंबई इथे असलेल्या wockhardt hospital ला जॉइंट कमिशन इंटरनॅशनल म्हणजेच JCI द्वारे मान्यता मिळालेली आहे. हा मान मिळवणारी wockhardt ही भारतातली दुसरी आरोग्य सेवा पुरवणारी संस्था आहे. wockhardt hospital चे पार्टनर्स हार्वर्ड मेडिकल इंटरनॅशनलशी संबंधित आहेत. हार्वर्ड मेडिकल स्कूल ही यूएसएची आंतरराष्ट्रीय शाखा आहे. (wockhardt hospital mumbai central)

wockhardt हार्ट हॉस्पिटलने भारतातील पहिली एंडोस्कोपिक हृदय शस्त्रक्रिया केली होती. या हॉस्पिटलमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये कोणत्याही अडचणी येऊ न देता उच्च-गुणवत्तेची वैद्यकीय सेवा दिली जाते. त्यासाठी इथे विशिष्ट केंद्रे आहेत. त्यांमध्ये कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, न्यूरोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, यूरोलॉजी, ऍस्थस्टिकस आणि मायनिमल ऍक्सेस सर्जरी केंद्रांचा समावेश आहे.

(हेही वाचा – elphinstone college बद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का? जरुर वाचा…)

 wockhardt hospital मध्ये आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी पुढील सुविधा उपलब्ध आहेत – 

  • वैद्यकीय तसेच गैर-वैद्यकीय सहाय्यासाठी समर्पित असलेली २४×७ आंतरराष्ट्रीय रुग्ण सेवा टीम
  • अपेक्षित उपचारांसाठी खर्चाचा अंदाज देणारे मॅन्युअल
  • सर्व वैद्यकीय भेटींसाठी ठराविक वेळापत्रक
  • डॉक्टरांचे प्रोफाइल स्पेशॅलिटीनुसार उपलब्ध
  • विमानतळ आणि रुग्णालयादरम्यान पिकअप आणि ड्रॉप सुविधांची व्यवस्था.
  • मोठ्या ओपीडी वेटिंग रूमची सुविधा
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारानंतर फॉलोअप सेवा आणि औषधं
  • उपचार प्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या कुटुंबासाठी हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस सहज उपलब्ध आहेत. (wockhardt hospital mumbai central)

(हेही वाचा – Karnataka IPS Officer : पहिल्या पोस्टिंगनंतर पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू)

wockhardt hospital मध्ये उपलब्ध असलेल्या इतर सेवा –

  • घरगुती आरोग्य सेवा उपलब्ध आहे.
  • वेटिंग लाउंज उपलब्ध आहे
  • २४ तास फार्मसी सेवा उपलब्ध आहे.
  • अतिथी जेवणाचा हॉल उपलब्ध आहे.
  • दंत चिकित्सा सेवा
  • पॅथॉलॉजी लॅब सेवा (wockhardt hospital mumbai central)

(हेही वाचा – general post office mumbai : GPO Mumbai या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि काय आहे वैशिष्ट्य?)

wockhardt hospital पर्यंत कसं पोहोचता येतं?

  • रुग्णालयापासून १८ किलोमीटर एवढ्या अंतरावर विमानतळ आहे.
  • हॉस्पिटलपासून मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन १ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
  • स्थानिक कॅब आणि टॅक्सी हॉस्पिटलजवळ सहज उपलब्ध आहेत. कॉल करुन देखील बुक करता येतात. (wockhardt hospital mumbai central)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.