- प्रतिनिधी
उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) ३ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार असून, मुंबई येथे विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
(हेही वाचा – Crime News : सोनं तस्करांना मदत करणाऱ्या सीमा शुल्क विभागाच्या हवालदारासह तिघांना अटक)
यावेळी उपराष्ट्रपती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यासोबतच, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शताब्दी स्तंभाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. (Jagdeep Dhankhar)
(हेही वाचा – मॅट्रिमॉनियल वेबसाईटमुळे तरुणी ठरली Love Jihad ची शिकार; राहुल असल्याचे भासवत मोहम्मदने केला तरुणीवर लैगिक अत्याचार)
केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था ही कापूस उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये कृषी तज्ज्ञ, संशोधक, उपस्थित राहतील. (Jagdeep Dhankhar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community