लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद विरोधात हिंदूंनी एकत्र या; भाजपा नेते T.Raja Singh यांचे आवाहन

62
लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद विरोधात हिंदूंनी एकत्र या; भाजपा नेते T.Raja Singh यांचे आवाहन
लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद विरोधात हिंदूंनी एकत्र या; भाजपा नेते T.Raja Singh यांचे आवाहन

देवभूमी उत्तराखंडमध्ये बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर मशिदी पाडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या बेकायदेशीर मशिदी हटवण्याची मागणी हिंदूंकडून केली जात आहे. त्यामुळे हिंदूंनी (hindu) लव्ह जिहाद(Love jihad), लॅण्ड जिहादच्या (Land Jihad) घटनांविरोधात एकत्र यावे, असे आवाहन भाजपा नेते टी. राजा सिंह (T.Raja Singh) यांनी दि. १ डिसेंबर रोजी केली. उत्तराखंड येथील एका सभेत ते बोलत होते. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुमारे ५०० लोक सहभागी झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली. (T.Raja Singh)

( हेही वाचा : Mumbai Police : भायखळा कुर्मी हत्याकांड – आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरकाशी महापंचायत येथे भाजप नेते टी.राजा सिंह (T.Raja Singh) यांच्यासह अनेकांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदू (hindu) समाजाच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी विनंती केली आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर बांधकामांवर ज्याप्रमाणे बुलडोजर चालवला तसाच उत्तराखंडमध्ये ही बुलडोजर चालवावा. तसेच आम्ही उत्तराखंडमध्ये लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद होऊ देणार नाही, असे ही टी. राजा . सिंह (T.Raja Singh) म्हणाले.

यावेळी गंगोत्रीचे आमदार सुरेश सिंह चौहान (Suresh Singh Chauhan) यांनीही या सभेला संबोधित करत असताना सांगितले की, शहराचे धार्मिक पावित्र्य राखणे हे राज्यासाठी महत्त्वाचे आहे. राज्यात मांस, अंडी आणि दारूवर बंदी घालावी, असे ते म्हणाले. तसेच काही लोक शहराचे वातावरण बिघडवण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न करत आहेत, पण आम्ही त्यांचा हेतू यशस्वी होऊ देणार नाही. उत्तरकाशी हे उत्तराखंड राज्यातील श्रद्धास्थान आहे. यामुळे याठिकाणी मांस, अंडी, दारूवर बंदी घालावी, असे विधान चौहान यांनी केले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.