Border Gavaskar Trophy, Adelaide Test : सरावादरम्यान रोहित शर्मा शुभमन गिलला मारतो आणि…

भारतीय संघ ॲडलेड कसोटीची तयारी करत आहे.

79
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : सरावादरम्यान रोहित शर्मा शुभमन गिलला मारतो आणि…
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : सरावादरम्यान रोहित शर्मा शुभमन गिलला मारतो आणि…
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ आता कॅनबेरा इथं प्रदर्शनीय सामना खेळून ॲडलेडला पोहोचला आहे. पण, हा प्रदर्शनीय सामना भारतीय संघाच्या सरावाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. खेळाडूंना सामन्याचा सराव आणि वातावरणातील बदल, खेळाडूंनी एकत्र येणं यासाठी सामन्याचा उपयोग झाल्याचं दिसतंय. मैदानावर भारताची फलंदाजी सुरू असताना डगआऊटमध्ये खेळाडूंमध्ये झालेली हलकी फुलकी चर्चा संघातील खेळीमेळीचं वातावरण दाखवते. डगआऊटमध्ये झालेल्या हास्यविनोदांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

डगआऊटमध्ये कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, हर्षित राणा आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर दिसत आहेत. रोहित (Rohit Sharma) आणि शुभमन गप्पा मारताना दिसतात. इथं रोहित आपलं म्हणणं शुभमनला पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आणि शुभमन टोलवाटोलवी करतोय असं बघून शेवटी तो शुभमनच्या छातीत कोपराने एक ठोसा हाणताना दिसतो. पण, यावर सगळे खेळाडू अधिकच हसतात. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा – Border Gavaskar Trophy : ॲडलेड कसोटीपूर्वी गौतम गंभीर ऑस्ट्रेलियाला परतले, संघ निवडीविषयी घेणार हा महत्त्वाचा निर्णय)

पर्थ कसोटीत रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाबरोबर नव्हता. तो कसोटीच्या चौथ्या दिवशी ड्रेसिंग रुममध्ये दाखल झाला. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने भारतीय संघाचं सक्षमपणे नेतृत्व केलं. अलीकडे रोहितचा फलंदाजीत फॉर्मही बरा नाहीए. त्यामुळे रोहितने मधल्या फळीत खेळावं असा एक विचार समोर येत आहे. ॲडलेड कसोटीपूर्वी स्वत: रोहित आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना हा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा – MPSC Exam मधील प्रश्न चर्चेत; मित्र दारू पिण्याचा आग्रह करतील, तेव्हा काय कराल ?)

त्याशिवाय रोहितचं (Rohit Sharma) वय पाहता तो कसोटी अजिंक्यपदाच्या स्पर्धेनंतर निवृत्तीही घेऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघाला नवीन कर्णधाराचा विचारही करावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीने जसप्रीत बुमराह हे नाव सध्या समोर येत आहे. तो भारतीय संघाचा उपकर्णधार तसंच गोलंदाजांचा कर्णधार आहे. यापूर्वी एकूण दोन कसोटींत त्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. आणि एका कसोटीत त्याचा पराभव झाला असला तरी त्याने नेतृत्वाची चमक दाखवून दिली आहे. एकीकडे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचं आव्हान आणि दुसरीकडे भारतीय संघातील स्थित्यंतर अशा कात्रीत सध्या भारतीय संघ आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.