- ऋजुता लुकतुके
दुबईत सुरू असलेल्या युवा टी-२० विश्वचषक स्पर्धेत एका फिरकीपटूला विचित्र पण, गंभीर दुखापतीलाल सामोरं जावं लागलं आहे. गंमत म्हणजे फलंदाजाला बाद केल्यानंतर केलेला नाच त्याच्या अंगाशी आला आहे. नेपाळचा १७ वर्षीय फिरकीपटू युवराज खत्री तो दुर्दैवी गोलंदाज आहे. त्याचा पायाचा घोटा असा दुखावला की, शेवटी खांद्यावर बसवून त्याला मैदानाबाहेर न्यावं लागलं. (U19 Asia Cup 2024)
(हेही वाचा – ICC Test Championship : भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठण्यासाठी लागणार गणिताची मदत)
नेपाळ विरुद्ध बांगलादेश सामन्यात ही घटना घडली. बांगलादेशचा संघ धावसंख्येचा पाठलाग करत असताना २८ वं षटक टाकायला युवराज आला. त्याच्या चेंडूवर मोहम्मद होसान रिझवान शून्यावरच पायचीत झाला. पंचांनी बोट वर करताच युवराजने आनंद साजरा करायला सुरूवात केली आणि आनंदाच्या भरात त्याने कोलांटी उडी मारली. तीच अंगलट आली. त्याच्या पायाचा घोटा पिरगळला गेला. सगळे खेळाडू युवराज भोवती जमले. शेवटी एका बदली खेळाडूने युवराजला पाठीशी बसवून मैदानाबाहेर नेलं आणि युवराज परत खेळायला येऊ शकला नाही. (U19 Asia Cup 2024)
(हेही वाचा – एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? Anjali Damania यांची ‘ही’ पोस्ट चर्चेत..)
A twist of fate 🫣
When luck smiles and frowns at the same time 🤕 🙆♂️#SonySportsNetwork #AsiaCup #NewHomeOfAsiaCup pic.twitter.com/OmPn5KepPu
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 2, 2024
ही घटना घडण्यापूर्वी युवराजने टाकलेल्या ६ षटकांमध्ये २४ धावा देत ४ बळी मिळवले होते आणि फलंदाजाला बाद केल्यानंतर तो अशीच कोलांटी उडी मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. या आधीच्या बळीवरही त्याने असाच आनंद साजरा केला होता. यावेळी मात्र उत्साहाच्या भरात त्याचा तोल गेला. त्याच्या दुखापतीचं स्वरुप किती गंभीर आहे हे अजून समजलेलं नाही. दरम्यान विजयासाठी १४२ धावांची गरज असताना बांगलादेशने हा सामनाही ५ गडी राखून जिंकला. (U19 Asia Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community