Temple : धर्मांध अमीन, यासीनने चोरली हिंदू आणि जैन मंदिरातील मूर्ती

114
Temple : धर्मांध अमीन, यासीनने चोरली हिंदू आणि जैन मंदिरातून मूर्ती
Temple : धर्मांध अमीन, यासीनने चोरली हिंदू आणि जैन मंदिरातून मूर्ती

अहमदाबादमध्ये पोलिसांनी हिंदू आणि जैन मंदिरात (Temple) मूर्त्यांची चौरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या टोळीतील २ जणांना अटक केली आहे. त्यांची नावे यासीन शेख (Yasin Sheikh) (३२) आणि अमीन पठान (Amin Pathan) अशी आहेत. त्यांच्या टोळीतील तिसऱ्या आरोपीला ही बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव अहसामुद्दीन आहे.

(हेही वाचा : एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? Anjali Damania यांची ‘ही’ पोस्ट चर्चेत..

या चोरांनी जैन आणि हिंदू मंदिरांना (Temple) लक्ष्य केले असून त्यांच्याकडे अनेक ठिकाणच्या मूर्त्या सापडल्या. पोलिसांनी सांगितले की, या आरोपींविरोधात पहिल्यापासून १२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मात्र यावेळी गुजरातच्या नवसारी येथे जैन मंदिरात झालेल्या चोरीनंतर संपुर्ण प्रकरण उघडकीस आले. बिलिमोरा येथे पोलिसांकडे चोरीची तक्रार करण्यात आली होती.चोरांनी त्याठिकाणाहून मूर्तींसोबत अन्य मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती. त्यासोबत गांधीनगरच्या अदालज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिरांला (Temple) आरोपीनी लक्ष्य करत महागड्या वस्तूंची चोरी केली होती. या चोरांच्या तपासासाठी अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पथकाला पाठवण्यात आले होते. (Temple)

पोलिसांनी तपासानंतर अमीन पठान (Amin Pathan) आणि यासीन शेख (Yasin Sheikh) नावाच्या आरोपींना अटक केली. हे दोन्ही आरोपी मूळचे पश्चिम बंगालचे रहिवाशी आहेत. सध्या ते अहमदाबाद चंदोलाजवळील बंगाली कॉलेनीत राहत होते. या दोघांच्या चौकशीनंतर त्यांनी तिसऱ्या आरोपीची माहिती दिली, ज्याचे नाव अहसामुद्दीन शेख (Ahsamuddin Sheikh) आहे. अटकेनंतर अमीन पठाण आणि यासीन शेखदवळ जवळजवळ ७ लाख रुपयांचे सामान सापडले. हे सामान मंदिरात चोरी करून मिळवण्यात आले होते. दोन्ही आरोपींवर ५ महत्त्वपुर्ण गुन्हे दाखल होते. ज्याचा आता तपास संपला आहे. (Temple)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.