Packaged Drinking Water : बाटलीबंद पाणी अशुद्ध; FSSAI चा धक्कादायक अहवाल

317

प्रवास असो अथवा समारंभ असो किंवा कोणत्याही मिटींगच्या वेळी सर्रासपणे बाटली बंद पिण्याचे पाणी (Packaged Drinking Water) वापरण्याची पद्धत आहे. यातलं बाटली शुद्ध असल्यामुळे बिनदिक्कतपणे लोकं बाटलीचे बूच उघडून बाटली तोंडाला लावतात, पण आता अशा लोकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण भारतीय अन्न आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) हे पाणी अशुद्ध असते असा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे आता अशा बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

(हेही वाचा Tripura तील हॉटेलमध्ये बांगलादेशी पर्यटकांना राहण्यास बंदी; हॉटेल ऑनर्स असोसिएशनचा मोठा निर्णय)

वार्षिक ऑडिट करावे लागणार 

FSSAI ने या बाटली बंद पिण्याच्या पाण्याला (Packaged Drinking Water) अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीत वर्गीकरण केले आहे. त्यामुळे आता या पाण्याची तपासणी करणे अनिवार्य आहे. आणि असे पाणी विकणाऱ्या कंपन्यांचे  ऑडिट केले जाणार आहे. नुकतेच केंद्र सरकारने बाटली बंद पाणी आणि मिनरल वॉटर उद्योगासाठी BSIचे प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य केले आहे. त्यानंतर FSSAI ने उपरोक्त निर्णय घेतला. नव्या नियमांनुसार आता सर्व बाटलीबंद पाणी (Packaged Drinking Water) विकणाऱ्या कंपन्यांना वार्षिक तपासण्या (ऑडिट) करावे लागणार आहे. लोकांनी खरोखर मिनरल वॉटर मिळावं. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांची सुरक्षा व दर्जा सुधारणं हे सरकारचं उद्दीष्ट आहे. लोकांना सुरक्षित गोष्टी मिळाव्यात व त्यांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशाने सरकारने हे नवे बदल केले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.