BJP ची महाशक्ती Eknath Shinde यांच्या पाठीशी; संजय राऊत यांचे वक्तव्य

103
BJP ची महाशक्ती Eknath Shinde यांच्या पाठीशी; संजय राऊत यांचे वक्तव्य
  • खास प्रतिनिधी 

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी लावून धरली असल्याने शिंदे यांच्या मागे भाजपाची अंतर्गत शक्ती काम करत असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. त्यात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही, “भाजपामधील महाशक्ती पाठिशी असल्याशिवाय एकनाथ शिंदे एवढा खेळ करू शकत नाहीत, तेवढी हिंमत त्यांच्यात नाही,” असे वक्तव्य करून संभ्रम आणखी वाढवला. (BJP)

(हेही वाचा – YS Jagan Mohan Reddy यांच्या अडचणी वाढणार; बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआय करणार तपास)

महाशक्ती कार्यक्रम करतेय

संजय राऊत ३ डिसेंबर २०२४ या दिवशी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीसांविरुद्ध जे रुसवे फुगवे आहेत, त्यामागे दिल्लीतील एखादी महाशक्ती कार्यक्रम करतेय, असं मला वाटतं. त्याशिवाय शिंदे असं धाडस करू शकत नाही. त्यांच्यात तेवढी हिंमतच नाही.” (BJP)

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी पाहिला ‘The Sabarmati Report’; ट्वीट करून म्हणाले…)

फडणवीसांना डावलण्यासाठी

राऊत पुढे म्हणाले, “जी लोकं अडीच वर्षापूर्वी ईडी, सीबीआयला घाबरून शिवसेना फोडून गेले त्यांना तीन वर्षात असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवत आहेत. दिल्लीच्या सुचनेनुसार डोंबाऱ्यांचे खेळ सुरू आहेत. दिल्लीतून डमरू वाजतोय आणि जो तो आपआपल्या भागात उड्या मारतोय,” अशा शब्दांत टीका करत राऊत यांनी, “फडणवीसांना डावलण्यासाठी हे सगळे सुरू आहे,” असा संशय व्यक्त केला. (BJP)

(हेही वाचा – U19 Asia Cup 2024 : बळी मिळवल्याच्या आनंदात केलेला नाच जेव्हा अंगाशी येतो…)

चर्चेला बळ

२० नोव्हेंबर २०२४ या दिवशी विधानसभा निवडणूक मतदान झाले आणि २३ नोव्हेंबर २०२४ ला निकाल लागला. भाजपा-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी (अप) यांच्या महायुतीला अभूतपूर्व यश (२३० जागा) मिळाले. मात्र निकाल लागून १० दिवस झाले तरीदेखील अद्याप राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडला असला तरी काही महत्वाच्या खात्यांची मागणी लावून धरली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू देऊ नये यासाठी दिल्लीतील एक चौकडी कार्यरत झाल्याचीही चर्चा आहे. संजय राऊत यांनी मंगळवारी ३ डिसेंबरला तसा उघड आरोपही केला आणि चर्चेला बळ मिळाले. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.