Bihar Assembly Election 2025 : बिहार निवडणुकीचा प्रचारही महिला केंद्रित होणार

42
Bihar Assembly Election 2025 : बिहार निवडणुकीचा प्रचारही महिला केंद्रित होणार
  • प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. त्या प्रमाणेच मध्य प्रदेशात देखील लाडली बहन योजनेने कमाल केली होती. यामुळेच की काय आगामी निवडणुका महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेऊन लढण्याची योजना अनेक पक्षांनी तयार केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी महिलांना मोफत बससेवा उपलब्ध करून दिली. तर पुढील वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार एक भव्य अशी यात्रा काढणार आहे. (Bihar Assembly Election 2025)

(हेही वाचा – Temple : धर्मांध अमीन, यासीनने चोरली हिंदू आणि जैन मंदिरातील मूर्ती)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. तेथील आरजेडी, जेडीयू, प्रशांत किशोर यांच्या जन सुराज या प्रादेशिक पक्षांसह भाजपा, काँग्रेससह राष्ट्रीय पक्षांनी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आता बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनता दलाच्या प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे निवडणूकीच्या तयारीत लागले आहे. लवकरच राज्यात मोठी यात्रा काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या यात्रेला ‘महिला संवाद यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. (Bihar Assembly Election 2025)

(हेही वाचा – U19 Asia Cup 2024 : बळी मिळवल्याच्या आनंदात केलेला नाच जेव्हा अंगाशी येतो…)

विधानसभेच्या २०२० च्या निवडणुकीत बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयू यांनी युती करुन लढली होती. त्यात भाजपाने ७२ जागा जिंकल्या, तर RJD ७५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तसेच नितीश यांच्या जेडीयूने ४३ जागा जिंकल्या होत्या. पण भाजपाने कमी जागा असलेल्या जेडीयूच्या नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देऊ केले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. तेथील आरजेडी, जेडीयू, प्रशांत किशोर यांच्या जन सुराज या प्रादेशिक पक्षांसह भाजपा, काँग्रेससह राष्ट्रीय पक्षांनी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे लवकरच राज्यात मोठी यात्रा काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या यात्रेला ‘महिला संवाद यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. यामुळे आगामी राज्यातील निवडणूका महिला मतदारांवर फोकस करून लढण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. (Bihar Assembly Election 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.