NewsMeter – https://newsmeter.in/fact-check/bjp-winners-in-up-by-polls-got-equal-votes-due-to-evm-manipulation-here-are-the-facts-739948
नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसह महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर, इंडी आघाडीच्या पक्षांनी त्यांच्या पराभवामागे EVM घोटाळा झाल्याचा आरोप करणे सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर, हिंदी भाषेतील हिंदुस्थान या वृत्तपत्राचे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यात भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या बातमीचे स्क्रीन शॉटही सोशल मीडियावर फिरत आहेत.
काय दाखवले स्क्रीन शॉटमध्ये?
उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार धर्मराज निषाद आणि फुलपूरमधून दीपक पटेल यांना प्रत्येकी ७८,३८९ मते मिळाली, तर समाजवादी पक्षाचे (एसपी) उमेदवार शोभावती वर्मा आणि मोहम्मद मुजातबा सिद्दीकी यांना प्रत्येकी ६६,९८४ मते मिळाली. सोशल मीडियातील नेटकेरी आरोप करत आहेत की, समान मतांची संख्या EVM घोटाळा झाल्याचे स्पष्ट करत आहे. एका X वापरकर्त्याने हा स्क्रीन शॉट शेअर करत म्हटले, EVM ची जादू बघा, भाजपाच्या दोन्ही विजयी उमेदवारांना समान मते मिळाली, तर विरोधी पक्षाच्या पराभूत उमेदवारांनाही समान मते मिळाली. समान मते हा योगायोग आहे की सहयोग?”
EVM का कमाल देखो भाजपा के दोनो जितने वाले प्रत्याशियों को एक जैसे वोट,
वही विपक्ष के हारने वाले को भी एक जैसे वोट यह संयोग है या सहयोग है!🤫 pic.twitter.com/lljiVmu5q0
— Munish Kumar Verma (@MunishKumarVe17) December 2, 2024
अनेक नेटकऱ्यांनी हे स्क्रीन शॉट शेअर केले आहेत, ज्याचा EVM घोटाळा झाल्याचा दावा केला आहे.
फॅक्ट चेक
न्यूज मीटरने याची सत्यता पडताळल्यावर हा दावा खोटा असल्याचे आढळले, कारण अधिकृत भारतीय निवडणूक आयोग (ECI) तपासाला असता दोन विधानसभा मतदारसंघातील विजयी आणि पराभूत उमेदवारांना समान मते मिळाली नाहीत. आमच्या लक्षात आले की, दैनिक हिंदुस्थानचे वृत्त 24 नोव्हेंबर रोजीचे आहे. हे वृत्त आग्रा येथून प्रकाशित झाले आहे. आम्ही दैनिक हिंदुस्थानचा ऑनलाइन ई-पेपर तपासला आणि निवडणूक आयोगाचा प्रकाशित झालेला निवडणूक निकाल पडताळला. त्यामध्ये फुलपूरमध्ये भाजपा उमेदवाराला 78,289 मते मिळाली, तर सपा उमेदवाराला 66,984 मते मिळाली. कटहारीमध्ये भाजपा उमेदवाराला 1,04,091 मते मिळाली आणि सपा उमेदवाराला 69,597 मते मिळाली. दाव्याप्रमाणे संख्या समान नाहीत. वर्तमानपत्राच्या बातमीचा स्क्रीनशॉट येथे आहे. आम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) संकेतस्थळावरील फुलपूर आणि कटहारी येथील निकालांसाठी आकडे तपासले आणि ते वृत्तपत्रात नोंदवलेल्या आकड्यांशी जुळतात परंतु सोशल मीडियावर फिरत असलेल्या दाव्यांशी जुळत नाहीत.
न्यूज मीटरने व्हायरल स्क्रीन शॉटबाबत हिंदुस्थान आग्रा आवृत्तीचे संपादक मनोज परमार यांच्याशी संपर्क साधला. परमार म्हणाले, आम्ही समान मते मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले नाही. सोशल मीडियावर व्हायरल स्क्रीन शॉटवरील बातमी काही खोडकर व्यक्तींनी मॉर्फ करून संपादित केली आहे. त्यामुळे, आम्ही असा निष्कर्ष काढला की, EVM मध्ये हेराफेरीमुळे फुलपूर आणि कटहारीमध्ये समान मतांचा दावा खोटा आहे.
Join Our WhatsApp Community