Yamunabai Savarkar स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अदृश्य नायिका

94
Yamunabai Savarkar स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अदृश्य नायिका
Yamunabai Savarkar स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अदृश्य नायिका

मनोज बंडोपंत कुवर, भगूर नाशिक

यमुनाबाई सावरकर (Yamunabai Savarkar), स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar ) यांच्या पत्नी, स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एका अदृश्य नायिका होत्या. पतीच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेसाठी त्याग, धैर्य आणि समर्पणाचे उदाहरण देणाऱ्या माईंच्या जीवनाची कहाणी आजच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. माईंचं जीवन हे स्वातंत्र्यासाठी पतीपासून वेगळं होण्याच्या दुःखाने सुरू झालं. 22व्या वर्षीच त्यांना हे कठीण वास्तव स्वीकारावं लागलं. वीर सावरकरांवर ब्रिटिशांनी दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि अंदमानच्या काळ्या पाण्यात पाठवलं. यामुळे माईंच्या आयुष्याचा मार्ग वेदना, संघर्ष आणि सामाजिक बहिष्कारांनी व्यापला. मात्र, या सगळ्या संकटांवर त्यांनी संयमाने मात केली. (Yamunabai Savarkar)

( हेही वाचा : Packaged Drinking Water : बाटलीबंद पाणी अशुद्ध; FSSAI चा धक्कादायक अहवाल)

सावरकरांना अंदमानला हलवण्यापूर्वी, माईंची त्यांच्याशी शेवटची भेट झाली. या भेटीत सावरकरांनी देशसेवेच्या आपल्या ध्येयाचा पुनरुच्चार करत माईंना खंबीर राहण्याचं आवाहन केलं. माईंचं पतीप्रती असलेलं समर्पण त्या क्षणी दिसून आलं. “मला तुमच्या चरणांकडे नजर टाकू द्या, म्हणजे पुढच्या जन्मी ते सहज ओळखता येतील,” या त्यांच्या शब्दांतून त्यागाची पराकाष्ठा दिसते. (Yamunabai Savarkar) अंदमानच्या कारागृहातील अमानुष छळ, पतीपासून विभक्त होण्याचं दुःख आणि समाजाकडून होणारा तिरस्कार, या सगळ्याला माई ठामपणे सामोऱ्या गेल्या. त्यांनी सावरकरांच्या घरातील जबाबदाऱ्या एकहाती सांभाळल्या आणि सावरकर कुटुंबीयांची आर्थिक व मानसिक उभारणी केली. माईंसाठी ही लढाई वैयक्तिक होती, पण ती स्वतंत्र भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाशी जोडली गेली होती.

माईंच्या धैर्याची तुलना करता येईल अशा कथा इतिहासात कमी आहेत. त्यांच्या जीवनात अनेक संकटं आली, पण त्यांनी कधीही आपलं ध्येय डगमगू दिलं नाही. सावरकरांचा लढा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता, आणि त्या लढ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निश्चय त्यांनी केला होता. माईंचं जीवन फक्त एका पत्नीचं नव्हतं, तर त्या एका आदर्श स्त्रीचं प्रतीक होत्या. त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर स्वातंत्र्यलढ्यासाठी त्या प्रेरणादायी होत्या. ब्रिटिशांचा रोष, समाजाचा बहिष्कार, आणि पतीच्या अनुपस्थितीतले आर्थिक ताण यांना सामोरं जाणं हे त्यांचं धैर्य सिद्ध करतं.आजच्या काळात माईंचं योगदान एका दुर्लक्षित अध्यायासारखं वाटतं.

सावरकरांचे विचार पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण इतिहासाने त्यांचं नाव मागे ठेवलं. माईंचं जीवन आजच्या महिलांसाठी प्रेरणा आहे, जे आपल्या जबाबदाऱ्या सांभाळताना संकटांवर मात करू इच्छितात. यमुनाबाई सावरकर (Yamunabai Savarkar)या भारतमातेच्या निस्वार्थ सेविकेचा आदर्श आजही काळाच्या परिघात झळाळत राहतो. त्याग, धैर्य आणि समर्पण या शब्दांना नव्या उंचीवर नेणारं माईंचं जीवन स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रियांच्या भूमिकेसाठी आदर्शवत आहे. आज आपण त्यांची आठवण काढताना, त्यांच्या समर्पणाला वंदन करत आहोत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.