एकामागून एक मशिदींच्या खाली मंदिरे असल्याच्या हिंदूंच्या दाव्यांनंतर Muslim करत आहेत प्रार्थनास्थळ कायद्याची ढाल

174
ज्ञानवापी, मथुरा, संभलनंतर आता बदायू जामा मशिदीच्या खाली मंदिरे असल्याचा दावा हिंदू करत आहेत, त्यासाठी सर्वेक्षणाची मागणी हिंदू पक्ष करत आहेत. त्यामुळे आता Muslim आता यावर प्रार्थनास्थळ कायदा (Worship Act) १९९१ ची ढाल करू लागले आहेत. या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी मुस्लिम करू लागले आहेत.
हिंदू पक्षकारांमुळे बदायूची जामा मशीद चर्चेत आली आहे. जामा मशीद हे नीलकंठ महादेवाचे मंदिर असल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. मंगळवारी हिंदू बाजूने जिल्हा न्यायालयात सर्वेक्षणाची मागणी केली असता मुस्लीम (Muslim) पक्षाने हा केवळ वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे उत्तर देत याला विरोध करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 डिसेंबर रोजी होणार आहे. हे प्रकरण सुनावणीसाठी घेणे योग्य आहे कि नाही, याचा निर्णय न्यायालय त्या दिवशी घेणार आहे.

हिंदू बाजू विरुद्ध मुस्लीम बाजू

मुस्लीम (Muslim) पक्षाचे वकील अन्वर आलम न्यायालयात म्हणाले, मंदिर पाडून मशीद बांधली, असे ते स्वतः हिंदू सांगत असतील, तेव्हा तेथे मंदिर अस्तित्वात नाही, हे उघड आहे. तेंव्हा हिंदू पक्षकारांचे वकील विवेक रेंडर न्यायालयाबाहेर म्हणाले, मुस्लीम बाजू आपला युक्तिवाद करत आहे, त्यानंतर आम्ही आमची बाजू मांडू. जर मंदिरच अस्तित्वात नाही, असे मुस्लिम पक्षकार म्हणत असतील  तर मग तुम्ही सर्वेक्षण करायला का घाबरतात?
2 सप्टेंबर 2022 रोजी, भगवान श्री नीलकंठ महादेव महाकाल (इशान शिव मंदिर), मोहल्ला कोट/मौलवी टोला यांच्या वतीने बदायू दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यात जामा मशीद व्यवस्था समिती, यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, एएसआय, केंद्र सरकार, यूपी सरकार, बदायूचे जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांना पक्षकार करण्यात आले होते. या याचिकेत दावा करण्यात आला होता की, सध्या बदायूच्या जामा मशिदीच्या जागेवर नीळकंठ महादेवाचे मंदिर आहे. गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयात तारखांमागून तारखा येत आहेत. हिंदू आणि मुस्लीम दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जात आहेत. या प्रकरणाची सुनावणी योग्य आहे की नाही याचा निर्णय येत्या 3 महिन्यांत न्यायालय घेईल, असे मानले जात आहे.
ASI सर्वेक्षण अहवालात राजा महिपालने मंदिर बांधले, जे मुस्लिमांनी (Muslim) उद्ध्वस्त केले. एएसआयने 1875 ते 1877 या काळात बदायू ते बिहारपर्यंत केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल तयार केला. हे सर्वेक्षण एएसआयचे तत्कालीन महासंचालक ए. कनिंगहॅम यांनी केले. कलकत्ता सरकारी मुद्रण अधीक्षक कार्यालयाने 1880 मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला. कुतुबुद्दीन ऐबकने बदायूला आपले मुख्यालय बनवले. बदायूचा पहिला गव्हर्नर शमसुद्दीन अल्तमश होता, जो नंतर दिल्लीचा राजा झाला, परंतु दिल्लीच्या गादीवर आरूढ झाल्यानंतरही बदायूबद्दलची त्याची आवड कायम होती. 5 वर्षानंतर त्यांनी आपला मोठा मुलगा रुकनुद्दीन फिरोज याला बदायूचा सुभेदार बनवले. अहवालात पुढे लिहिले आहे की, ब्राह्मणांच्या मते बदायूचे पहिले नाव बेदामाऊ किंवा बदमैया होते. त्यानंतर तोमर वंशाचा राजा महिपाल याने येथे एक मोठा किल्ला बांधला, ज्यावर आता शहराचा एक भाग उभा आहे. अनेक मिनार अजूनही उभे आहेत. असेही म्हटले जाते की, महिपालने हरमंदर नावाचे मंदिर बांधले, जे मुस्लिमांनी (Muslim)  नष्ट केले. त्याच्या जागी सध्याची जामा मशीद बांधण्यात आली. मंदिरातील सर्व मूर्ती मशिदीखाली गाडल्या गेल्या यावर लोकांचे एकमत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.